fbpx
Free Call

101 Shaley Gite

₹120
120Pages
AUTHOR :- Pratima Bhand
ISBN :- 9788177864311

Category: Product ID: 2853

Description

शालेय जीवनात गीतांचे फार महत्त्व आहे. मूल शाळेत जाण्यापूर्वी आई त्याच्याकडून बोबडेपणीच बडबडगाणी वदवून घेते. शाळेत प्रार्थनेने गीतांची ओळख होते. विविध कार्यक्रमांतून मुलं कृतिगीतं सादर करू लागतात. शाळेतील विविध समारंभासाठी स्वागतगीते गायली जातात.
पुढे देशभक्तिगीते, समूहगीते, मनोरंजनपर गीतांद्वारे शालेय गीतांचा अखंड प्रवास सुरू असतो. अशा विविध गीतांचा हा संग्रह शाळेतील मुलांसाठी, पालकांसाठी आणि शाळेतील शिक्षकांसाठी खास तयार केला आहे. ही गीते म्हणजे भारतीय संस्कृतीचा वारसाच आहे.
या गीतांच्या माध्यमातून मुलांवर सहजरीत्या नीतिमूल्यांची रुजवण होत असते. आज मुलांना दूरदर्शनच्या विळख्यातून बाहेर काढून उत्तम गीतांच्या माध्यमातून त्यांच्यावर सुसंस्कार करणे ही काळाची गरज आहे. मुले घडविण्यात या गीतांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. समाजपरिवर्तनाच्या वाटचालीत मुलांवर नीतिमूल्यांचे संस्कार करणे, त्यांच्या मनात देशभक्ती रुजविणे अपरिहार्य आहे.
हा १०१ शालेय गीतांचा संग्रह मुलांना आनंददायी व मोलाचा ठरेल. यामधील प्रार्थना, राष्ट्रगीत, ध्वजगीते आणि देशभक्ती, मनोरंजन, नीतिमूल्ये यावर आधारित गीते; तसेच धार्मिक व बालगीते यामुळे मुलांवर अनेक सुसंस्कार करणे सहज शक्य होते. आजची बालके उद्याचे नागरिक आहेत. म्हणून ही वैविध्यपूर्ण शालेय गीते मुलांचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कारी व देशहितोपयोगी असे घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “101 Shaley Gite”

Your email address will not be published. Required fields are marked *