fbpx
Free Call

30 DAYS : Change Your Habits, Change Your Life

₹ 295
248 Pages

AUTHOR :- Marc Reklau
ISBN :- 9789352203109

Categories: , , , Product ID: 3885

Description

काही लोकांना इच्छित ते सगळं काही मिळतं आणि काहींना मिळत नाही. याबाबत तुम्हाला कधी कुतूहल वाटलं आहे का? आयुष्यात बदल घडण्याची वाट पाहून तुम्ही थकून गेला आहात का? आयुष्यात काही चमत्कार घडून आयुष्य बदलण्याची अपेक्षा तुम्ही अजून किती काळ करत राहणार? आपल्याला हवं तसं आयुष्य घडविण्यासाठी काय करावं लागतं, हे तुम्हाला ‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ या साधे सोपे उपाय सांगणाऱ्या आणि प्रवाही भाषाशैली असणाऱ्या पुस्तकातून शिकायला मिळेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेले लेखक मार्क रेक्लाऊ यांनी या पुस्तकातून काही उपयुक्त आणि अनुभवाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या सूचना, युक्त्या आणि स्वाध्याय दिले आहेत. या सूचना अंगी बाणवून दीर्घकाळ, सातत्यानं अमलात आणल्या तर आयुष्यात कल्पनेपलीकडे सुधारणा होते. ‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ यातली एक चांगली गोष्ट अशी की, नव्या सवयी अंगी बाणवून तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेनं सातत्यानं, कणाकणानं पुढे सरकू शकता. हे कसं शक्य आहे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल. तुम्ही हे करू शकता! तुमच्या अंगी पात्रता आहे हे करण्याची! या पुस्तकानं खरोखरच आयुष्यात बदल घडतो आणि तुम्ही एक अधिक आनंदी, आरोग्यपूर्ण, समाधानकारक आयुष्य निर्माण करू शकता. यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल : आपोआप बदल घडण्याची वाट पाहणं थांबवून, बदल घडवतील अशा कृती प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतील!

Additional information

About Author

मार्क रेक्लाऊ हे एक प्रशिक्षक, व्याख्याते आणि लोकप्रिय लेखक आहेत. लोकांना त्यांचं इच्छित जीवन जगण्याइतकं सक्षम करणं आणि त्यासाठी आवश्यक ते सगळे मार्गदर्शन, शिकवण त्यांना उपलब्ध करून देणं हे मार्क यांच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. त्यांचा संदेश सोपा आहे : पुष्कळ लोकांना आयुष्याची फत सुधारण्याची इच्छा असते; पण त्यासाठी सातत्यानं दीर्घकाळापर्यंत काही विशिष्ट स्वाध्याय करावे लागतात, त्याला त्यांची तयारी नसते. तुमच्या ध्येयाच्या मार्गावर चालण्यासाठी मदत करतील, अशा काही उपयुक्त सवयी अंगी बाणवून घेऊन योजनापूर्वक पद्धतीनं तुम्ही आयुष्यात आनंद आणि यश निर्माण करू शकता. मार्क यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही 'www.marcreklau.com' या संकेतस्थळावर त्यांच्याशी थेट संपर्क करू शकता, इथे तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक माहितीही मिळेल. तुम्ही त्यांच्याशी ट्विटर वरूनही @MarcReklau संपर्क साधू शकता. फेसबुक किंवा http://www.goodhabitsacademy.com या संकेतस्थळावरही तुम्ही मार्क यांच्याशी संपर्क करू शकता.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “30 DAYS : Change Your Habits, Change Your Life”

Your email address will not be published. Required fields are marked *