fbpx

All is Well | ऑल इज वेल

₹299

272Pages
AUTHOR :- Louise L. Hay; Mona Lisa Schulz
ISBN :- 9789352202454
Order On Whatsapp

Share On :

Description

‘ऑल इज वेल’ हे एक अव्वल दर्जाचे पुस्तक असून अंतर्ज्ञानी लुईस हे यांच्या बुद्धिमत्तेला वाहिलेली ही जणू आदरांजलीच आहे. एड्सच्या रुग्णांना तसंच इतर असंख्य व्यक्तींना आणि त्यांच्या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देण्यात सर्वांत अग्रेसर कुणी असेल तर त्या लुईस हे आहेत.
– कॅरोलीन मीस, न्यूयॉर्क टाइम्स ‘आर्चटाइप्स : अ बिगिनर्स गाइड टू युवर इनर नेट’ या बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखिका हे पुस्तक म्हणजे, लुईस हे आणि मोना लिसा शुल्झ या दोन बेस्टसेलर लेखिकांनी मिळून, ‘हील युवर बॉडी’ या पुस्तकातल्या उत्कृष्ट शिकवणुकींचं केलेलं पुनरावलोकन आहे. ‘ऑल इज वेल’ हे पुस्तक म्हणजे लुईस हे यांनी सिद्ध करून दाखवलेली सकारात्मक पद्धती आणि मोना लिसांच्या वैद्यकीय ज्ञान व देहाचं अंतर्ज्ञान यांच्या संयोगानं निरोगी व स्वस्थ कसं राहावं यासाठीचं मार्गदर्शन आहे. याच पुस्तकात काही रुग्णांवर पारंपरिक आणि पर्यायी औषधे, सकारात्मक विचारपद्धती, आहारातील बदल इत्यादींचा शिस्तबद्ध वापर करून स्वास्थ्य मिळवण्याविषयीचा संशोधनपर अहवालसुद्धा सादर केलेला आहे.
प्रस्तुत पुस्तकाचा वापर करून शरीराचे व मनाचे स्वास्थ्य मिळवूया आणि समतोल व निरोगी आयुष्य जगूया.

Additional information

About Author

लुईस हे 'यू कॅन हील युवर लाईफ' या आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखिका आणि ५० दशलक्ष पुस्तकप्रतींच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या मार्गदर्शिका. स्वतःला स्वतःचीच मदत मिळवून घेण्यासाठी आणि आपले सुप्त गुण ओळखण्यासाठी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे. निश्चयाच्या सामर्थ्यामुळे सकारात्मक बदल कसे होतात याविषयावर त्यांनी जगभरातल्या लोकांना मार्गदर्शन केलं. प्रौढांसाठी आणि मुलांसाठी मिळून लुईस हे यांची ३० पुस्तके आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या 'पॉवर इज विदीन यू' आणि 'हील युवर बॉडी' या पुस्तकांचा बेस्टसेलरमध्ये समावेश आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “All is Well | ऑल इज वेल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat