fbpx

Antaralateel Gammat Jammat | अंतराळातील गंमत जंमत

₹120

136Pages
AUTHOR :- Ramesh Mahale
ISBN :- 9789352200474
Order On Whatsapp

Share On :

Description

भारताने मंगळावर यान पाठवून अवकाश संशोधन क्षेत्रात एक महत्त्वाची कामगिरी केली. या ऐतिहासिक घटनेची नोंद समस्त जगाने घेतली आहे. अंतराळातील घटना, आश्चर्य यांचे कुतूहल मानवाला नवनिर्मितीची प्रेरणा देत असते. अंतराळ हा घटक पूर्वीपासूनच मानवी मनाचा एक अकल्पित गाभा आहे. प्रत्येकजण अंतराळात फेरफटका मारण्याचा विचार करत असतो आणि अंतराळाविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो.
अंतराळातील अशाच काही रंजक व ज्ञानवर्धक विविध घटना व यानांच्या कार्याची माहिती प्रस्तुत पुस्तकात दिली आहे. विज्ञानप्रेमी वाचकांसाठी या पुस्तकातील कथांचा आस्वाद जणू एक पर्वणीच आहे.

Additional information

About Author

रमेश महाले
शिक्षण : बी.एस्सी. बी.एड. (निवृत्त मुख्याध्यापक) जन्म : १ मार्च १९४४
शिक्षण क्षेत्रातील असाधारण कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार. . मुलांसाठी बालकथा व विज्ञान विषयावरील ९५ पुस्तके प्रकाशित.. . महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे १९९५ पासून इ. ७ वी च्या
बालभारतीमध्ये 'डॉल्फीन' लेखाचा समावेश. . आठ भाषांतील बालसाहित्यिकांच्या चर्चासत्रासाठी बंगलोर येथे सहभाग.
जळगाव आकाशवाणीवर व्याख्याने, नाशिक आकाशवाणीवर 'सृष्टिरंग'मध्ये
सहभाग. . गुजरात सरकारतर्फे इ. ३ री साठी 'जिराफ' व ७ वी साठी 'डॉल्फिन'
लेखाचा पाठ्यपुस्तकात समावेश. ‘पक्ष्यांची दुनिया' या पुस्तकास मराठी विज्ञान परिषदेचा तसेच साहित्य
परिषदेचा पुरस्कार. . 'पिंटू आणि यांत्रिक मानव' या पुस्तकास नागपूरच्या पद्मगंधा प्रतिष्ठानचा
प्रथम पुरस्कार. सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा बालवाङ्मयाचा कै. श्यामकांत शिवरामे प्रथम पुरस्कार.
'विज्ञान' या पुस्तकास राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार (२००८). 'अंतराळातील स्टेशन' या पुस्तकास राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (२०११). 'चला अंतराळ' या पुस्तकास राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (२०१३-१४).

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Antaralateel Gammat Jammat | अंतराळातील गंमत जंमत”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat