fbpx

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज

₹350

272Pages
AUTHOR :- Girish Jakhotiya
ISBN :- 9788177869644
Order On Whatsapp

Share On :

Description

शिवरायांची व्यूहनीती यशस्वी ठरली ती त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यामुळे. आपल्या अजोड व्यवस्थापकीय कौशल्याच्या बळावर त्यांनी आपल्या शत्रूंना नामोहरम केले व स्वराज्याची घडी उत्तम बसविली. उत्तम व्यवस्थापनामध्ये व्यूहरचना व व्यवस्थापन यांचा परस्परांतील मेळ, प्रसंगनिष्ठ चतुराई, साहाय्यक संघ, प्रकल्पाची पूर्वतयारी, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तडीस नेण्यात येणारी कामे, किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे शिवरायांनी दाखवून दिले.
स्वतःजवळ कुठलीही पुरेशी साधनसामग्री नसताना, बाकीचे मराठा सरदार परकीयांसमोर नतमस्तक होत असताना नि सारा समाज संभ्रमित-गलितगात्र झालेला असताना शिवाजी महाराजांनी जे ‘कल्पक धाडस’ केले, त्या धाडसाच्या व्यूहरचना-प्रक्रिया आजच्या तरुणांना कळल्या पाहिजेत.
आजच्या ‘कॉर्पोरेट जगता’चे नेतृत्व सुजाण तरुणांनी करावयाचे असेल, तर छत्रपतींच्या अनेक व्यूहनीतींचा साकल्याने विचार व अंगीकार करावा लागेल.
या पुस्तकात खालील मुद्द्यांचा साकल्याने विचार करण्यात आला आहे.

शिवरायांचे-
• नियोजन आणि व्यवस्थापन
• नेतृत्व आणि कार्यपद्धती
• अर्थशास्त्र आणि अर्थकारण
• दूरदृष्टिता आणि विचारसरणी
• आधुनिक धार्मिकता व कर्मयोग
• उत्तम चारित्र्याची कल्पना

Additional information

About Author

डॉ. गिरीश प. जाखोटिया
• 'जाखोटिया अॅण्ड असोसिएट्स', विलेपार्ले (पू.), मुंबई या व्यवस्थापकीय सल्लागार संस्थेचे संचालक. • ख्यातनाम व्यवस्थापकीय, वित्तीय व उद्योजकीय सल्लागार.
• तब्बल ६० भारतीय व विदेशी कंपन्या आणि बँकांचे सल्लागार.
• जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्था, मुंबई विद्यापीठात १५ वर्षे प्राध्यापक म्हणून अनुभव. • भारतात व भारताबाहेर विविध विषयांवर २००० पेक्षा अधिक व्याख्याने.
• पत्नीसह उद्योगजगतातील व्यवस्थापकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन.
• सहा इंग्रजी व सहा मराठी पुस्तकांचे लेखक.
• अनेक उद्योजकीय व वित्तीय संस्थांसाठी काम करताना नव्या कल्पना व रचनांचा वापर.
• भारतीय व्यवस्थापनअर्थकारणाचा विस्तृत आढावा घेताना गेली ३० वर्षे ‘आध्यात्मिक अर्थशास्त्रा'चाही अभ्यास सुरू.
सन्मान व पुरस्कार
• सन १९९५ : 'बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन'तर्फे अखिल भारतीय व्यवस्थापन शिक्षणातील सर्वोत्तम प्राध्यापक सन्मान प्राप्त.
• सन १९९६ : 'अखिल भारतीय व्यवस्थापन – शिक्षणातील सर्वोत्तम प्राध्यापक' हा सन्मान प्राप्त.
• पुस्तकांना मुंबई मराठी साहित्य संघ, पद्मगंधा प्रतिष्ठान, आपटे वाचन मंदिर व पुणे मराठी ग्रंथालयातर्फे 'चेतना पुरस्कार' प्राप्त.
• शोधनिबंध व केस स्टडीजना राष्ट्रीय पारितोषिके प्राप्त.
कृष्णविषयक प्रसिद्ध व्याख्याने
• तुम्हीच व्हा श्रीकृष्ण.
• श्रीकृष्ण : आद्य व्यवस्थापकीय गुरू.
• श्रीकृष्ण व वैश्विक धर्म
• श्रीकृष्ण : एक बंडखोर विचारवंत
• श्रीकृष्ण : एक राजकीय मुत्सद्दी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat