fbpx

GST Aaplyasathi | जीएसटी आपल्यासाठी

₹299

288Pages
AUTHOR :- Umesh Sharma
ISBN :- 9789352201686
Order On Whatsapp

Share On :

Description

मान्यवरांच्या प्रतिक्रिया कर हा सरकार आणि नागरिक या दोन्ही घटकांसाठी महत्त्वाचा विषय आहे.
त्यामुळे याविषयी समाजात जास्तीत-जास्त जागृती निर्माण होणे आवश्यक आहे.
त्यादृष्टीने श्री. उमेश शर्मा यांनी केलेले लिखाण निश्चितच महत्त्वपूर्ण आहे.
देशात आता वस्तू व सेवाकर लागू होऊन अप्रत्यक्ष करप्रणालीत सुसूत्रता आणण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
भविष्यात करांविषयी अभ्यास करणाऱ्या नव्या पिढीला हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
– श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र या पुस्तकात आपण जी एस टी संबंधी अथपासून इतिपर्यंत सर्व विषयांचा साकल्याने समावेश केला आहे.
“कर’ यासारखा किचकट विषय असूनसुद्धा, सहज सर्वांना समजेल अशा भाषेतील हे लिखाण मनाला भावले.
पुस्तकाची मांडणी अतिशय उत्तम आणि नजरेला सुखावणारी. 
या भाषेमुळे, या मांडणीमुळे सर्वजण हे पुस्तक आपलेसे करतील.
मला खात्रीने वाटते की, या पुस्तकामुळे “कर’ या विषयातील सर्वसामान्यांची भीती जाऊन ते आपले करनियोजन सहजच करू शकतील.
– श्री. सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, महाराष्ट्र माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे भारताला आर्थिक सबल बनविण्याचे स्वप्न आहे, त्यासाठी हे पुस्तक मोलाचे ठरेल.
या पुस्तकामुळे जी जनजागृती होणार आहे, तिचाही या मोहिमेत अगदी महत्त्वाचा वाटा असेल.
हे पुस्तक सर्वसामान्य जनतेला निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
माझ्याकडून या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा !
– श्री. प्रशांत बंब, सदस्य, महाराष्ट्र विधानसभा आपल्या देशामध्ये आर्थिक बाबतीत सलगपणे लेखन करणारे खूप कमी लोक आहेत. सामान्य जनतेला आयकर, विक्रीकर, सेवाकर हे सर्व विषय खूप क्लिष्ट वाटतात. यामध्ये सतत बदल होत असताना या गोष्टी समजावून घेणे या पुस्तकाद्वारे सर्वांना सोपे जाईल.
– श्री. राजेंद्र दर्डा, माजी शिक्षणमंत्री व राज्य अर्थमंत्री

Additional information

About Author

श्री. उमेश शर्मा हे औरंगाबाद शहरातील प्रथितयश चार्टर्ड अकाउंटंट असून ‘आर. बी. शर्मा अॅण्ड कं. चार्टर्ड अकाउंटंट्स' या वित्तविषयक फर्मचे भागीदार व प्रमुख आधारस्तंभ आहेत.
श्री. उमेशशर्मा जन्म : २८/०२/१९७६
• सीएच्या फाउंडेशन परीक्षेत भारतातून ४२वा क्रमांक पटकावला- १९९७. • औरंगाबाद सीए बॅचचे माजी अध्यक्ष- २००२-०३ • “दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ इंडिया' या संस्थेच्या पश्चिम
विभागीय मंडळाचे कार्यकारिणी सदस्य- २०१५-१६ ते २०१७-१८. • दै. लोकमत, सेल्सटॅक्स रिव्ह्यू, टॅक्सगुरू, मनी प्लस या मासिकांमध्ये
करविषयक लिखाण. ऑल इंडिया रेडिओ, रेडिओ मिर्ची व चेंबर ऑफ कॉमर्स इ. माध्यमातून करविषयक कार्यक्रम. मागील चार वर्षांपासून दै. लोकमतमध्ये “करनीती' हे लोकप्रिय साप्ताहिक सदर लेखन. “गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स'' म्हणजेच जीएसटी या विषयावर महाराष्ट्र,
गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यांमध्ये विविध सीए संघटनांतर्फे सेमिनार्स. • व्यापारी महासंघ धुळे व औरंगाबाद यांच्या सौजन्याने "जीएसटीची तोंडओळख' हे पुस्तक प्रकाशित.
औरंगाबाद टॅक्स पॅक्टिशनर असोसिएशनतर्फे प्रकाशित “एम व्हॅट ऑडिट मॅन्युअल – २००६' चे मुख्य संपादक. 'मुंबई सेल्सटॅक्स पॅक्टिशनर असोसिएशन'तर्फे हैद्राबाद येथे झालेल्या
आर.आर. सी. मध्ये “बेस्ट पेपर रायटर' म्हणून सन्मानित. • “जीएसटी आपल्यासाठी' आणि 'इन्कमटॅक्स आपल्यासाठी' हे
करविषयक पुस्तके प्रकाशित.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “GST Aaplyasathi | जीएसटी आपल्यासाठी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat