fbpx

Isapnititil Sanskar Goshti | इसापनीतीतील संस्कार गोष्टी

₹50

40Pages
AUTHOR :- Baba Bhand
ISBN :- 9789352201365
Order On Whatsapp

Share On :

Description

भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून पारंपरिक कथा आपण ऐकलेल्या आहेत. या कथांनी मानवी जीवनमूल्यांची जपणूक करून मानवांवर संस्कार केले. या कथांमध्ये इसापनीती कथांचा महत्त्वाचा वाटा आहे.
इसापच्या नीतिकथा रंजक आणि उद्बोधक आहेत. गेली अनेक वर्षं या कथांनी लहान-थोरांना खिळवून ठेवत कोणत्या प्रसंगी जीवनात कसे वागावे, याचे ज्ञान आणि शिकवण दिली आहे. बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासारविचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही इसापच्या नीतिकथा आबालवृद्धांना प्रेरणा देणाऱ्या आहेत.

Additional information

About Author

बाबा भांड
जन्म वडजी, पैठणजवळील खेड्यात, २८ जुलै १९४९.
बालपणापासून कमवा व शिका हा संस्कार. शिक्षण एम. ए. इंग्रजी. आठवीत बालवीर चळवळीत राष्ट्रपतीपदकाने सन्मानित. दहावीत जागतिक स्काउट-गाइड मेळाव्याच्या निमित्तानं अमेरिका-कॅनडा आदी दहा देशांचा प्रवास. लेखकच व्हायचं स्वप्न होतं. सहावीपासून लेखनास सुरुवात. १९७५ साली पत्नी सौ. आशाच्या मदतीनं धारा व नंतर साकेत प्रकाशनाची सुरुवात. आतापर्यंत अठराशे पुस्तकांचे प्रकाशन.
बाबा भांड यांच्या आतापर्यंत नऊ कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, चार प्रवासवर्णनं, चार ललित गद्य, चार चरित्रं, चार आरोग्य व योग, नऊ संपादनं, चार अनुवाद, पंधरा किशोर कादंबऱ्या, एकोणावीस बालकथा संग्रह, तीन एकांकिका, सत्तावीस नवसाक्षरांची पुस्तके प्रकाशित.
साहित्य अकादमीचा बालसाहित्य, महाराष्ट्र शासनाचे अकरा, महाराष्ट्र फाउंडेशन, दमाणी आणि इतर पंधरा पुरस्कार. त्यांच्या साहित्यावर पाच विद्याथ्यांची पीएच.डी., अभ्यासक्रमात पुस्तके व पाठ.
जन्मगावी पाणलोटक्षेत्र विकास, वाचनालय, गरीब अपंग-मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा, योगसाधना संस्थेत विश्वस्त, समाजोपयोगी कामात सहभाग, प्रकाशनाच्या कमाईतून वरील कामासाठी पंचवीस लाखांहून अधिक मदत. लेखन-प्रकाशनासोबत शेती, प्रवास आणि फोटोग्राफीचा छंद. महत्त्वाचं जग फिरून झालंय.
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, तसेच सदस्य सचिव, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई.
email : baba.bhand@gmail.com, http://www.bababhand.com

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Isapnititil Sanskar Goshti | इसापनीतीतील संस्कार गोष्टी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat