fbpx

J.R.D. Tata | जे. आर. डी. टाटा

₹350

288 Pages

AUTHOR :- Jaiprakash Zende
ISBN :- 9789352203130
Order On Whatsapp

Share On :

Description

जे.आर.डी ‘भारतासाठी उत्तम, तेच टाटांसाठी!’ अशा उदात्त विचारसरणीसह तब्बल दीडशे वर्षांचा संपन्न वारसा असलेल्या टाटा उद्योगसमूहाची धुरा ज्या खांद्यांनी अर्धशतकाहून अधिक काळ समर्थपणे वाहिली आद उद्योजकतेचे आणि व्यक्तित्वाचे मानदंड ज्यांनी आपल्या उन्नत कृतींतून उभारले विशाल उद्योगसमूहाद्वारे संपत्तीनिर्मिती हाच देशसेवेचा मार्ग निवडून भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक अर्थक्षितिजावर प्रतिष्ठा दिली त्या जहांगीर रतन दादाभॉय टाटा यांनी आपल्या प्रखर आणि नैतिक जाणिवांतूनच जीवनाचा मोक्ष साधला त्यांच्या ‘अपत्या’नं, अर्थात एअर इंडियानं, त्यांच्या निधनानंतर पुढील सार्थ शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली “त्यांनी आकाशाला स्पर्श केला आणि आकाशही हसलं. त्यांनी आपले बाहू पसरले आणि अवघं जग कवेत घेतलं. त्यांच्या दूरदृष्टीनं व्यक्ती आणि संस्था खूप मोठ्या झाल्या.” आपल्या अगणित संस्थांबरोबरच अवघ्या देशाला प्रगतीची वाट दाखवणार्‍या एका सर्वकालीन महान उद्योगपतीचं वेधक चरित्र.

Additional information

About Author

जयप्रकाश भालचंद्र झेंडे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. टाटा मोटर्स या जनप्रसिद्ध वाहन उद्योगात त्यांनी तीस वर्षे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यात प्लॅनिंग, कास्टिंग आणि इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग या विभागांचा समावेश होता. या काळात भारतात नवीनच आलेल्या कायझेन, सजेशन स्किम, क्वालिटी सर्कल, फाइव्ह एस अशा आपल्या कामात निरंतर सुधारणा करणाऱ्या जपानी कार्यपद्धतीत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. निवृत्तीनंतर आता ते औद्यागिक सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत. आतापर्यंत भारतातील अनेक प्रसिद्ध संस्थांमधून सुमारे १५०० या वर कार्यशाळा घेऊन २५,००० अधिकारी आणि कामगारांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. त्यांना लेखनाचा छंद आहे. यातूनच त्यांनी अनेक दैनिके आणि नियतकालिकांतून सुमारे २५० लेख लिहिले आहेत. त्यांच्या लेखनाचे , विषय सर्वसाधारणपणे स्वतःत आणि संस्थेत सुधारणा कशी घडवून आणता येईल याच्याशी निगडित असतात. त्याचबरोबर आतापर्यंत त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना आतापर्यंत १) इन्सान या राष्ट्रीयपातळीवर काम करणाऱ्या संस्थेकडून जीवनगौरव', २) इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटकडून 'प्राइड ऑफ इंदिरा' आणि ३) इंटरनॅशनल बुक हाउस, दिल्ली यांच्याकडून 'बेस्ट सिटिझन ऑफ इंडिया' हे सन्मान मिळाले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “J.R.D. Tata | जे. आर. डी. टाटा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat