fbpx

Kisse Shastradnyanche | किस्से शास्त्रज्ञांचे

₹60

64Pages
AUTHOR :- Sunil Vibhute
ISBN :- 9789352202256
Order On Whatsapp

Share On :

Description

विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत संशोधन करताना शास्त्रज्ञ जात, धर्म, देश, भाषा, स्थळ, काळ यांची बंधने विसरून झपाटून काम करत असतात. सामान्य माणसाचे झपाटणे आणि शास्त्रज्ञाचे झपाटणे याच्यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते. अज्ञाताचा शोध आणि मानवी कल्याणाचे सूत्र डोळ्यासमोर ठेवून ते अखंडपणे प्रयोग आणि अभ्यास करतात. परंतु शास्त्रज्ञांमध्येही सर्वसामान्य माणूस दडलेला असतो. सामान्य माणसांसारख्याच भावभावना असलेल्या शास्त्रज्ञांच्या जीवनात यशापयशाचे चढउतार, आशानिराशांची वळणे येतात. त्यांच्या ‘झपाटलेपणामुळे’ त्यांच्यावर मानापमानाचे प्रसंग येतात; पण त्यामुळे विचलित न होता अधिक चिकाटीने, अथक परिश्रम करून ते आपले ध्येय गाठतात. संशोधकांनी मानवी कल्याणासाठी केलेल्या महान कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या जीवनातील काही रंजक घटना व प्रसंग किश्शांच्या स्वरूपात या पुस्तकात संकलित केले आहेत. वाचकांना त्यामुळे शास्त्रज्ञांची ‘खरी ओळख’ पटण्यास मदत होईल.

Additional information

About Author

"अल्प परिचय…
प्रा. सुनील शिवप्रसाद विभूते
एम. एस्सी., एम. फिल., डी. एच. ई.

• ऑगस्ट १९८६ पासून श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी, रसायनशास्त्र विभागात वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून कार्यरत.
• महाराष्ट्र टाइम्स, दै. सकाळ, दै. लोकमत, दै. पुढारी, दै. संचार, दै. तरुण भारत इत्यादी वृत्तपत्रांतून विविध वैज्ञानिक विषयांवर जवळपास शंभर लेखांचे लेखन, तसेच विविध सदरांचे लेखन.
• सोलापूर आकाशवाणी केंद्र, उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावर विज्ञानविषयक कार्यक्रमातून पंचवीस व्याख्यानांचे प्रसारण.
• दै. लोकमत दिवाळी अंक आणि साप्ताहिक सकाळमध्ये विज्ञान कथा प्रकाशित.
• एम. फिल. साठी केलेल्या संशोधनावर आधारित लिहिलेला शोधनिबंध जर्नल ऑफ पॉलिमर सायन्स पार्ट-ए (व्हाल्यूम-३५, १९९७) या न्यूयॉर्कहून प्रसिद्ध होणाऱ्या प्रख्यात आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित.
• मराठी विज्ञान परिषदेचे आजीव सदस्यत्व व मराठी विज्ञान परिषद बार्शी शाखेचे कार्यकारिणी सदस्य.
"

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kisse Shastradnyanche | किस्से शास्त्रज्ञांचे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat