fbpx

Laingik Shikshan | लैंगिक शिक्षण

₹150

128Pages
AUTHOR :- Dr. Jagannath Dixit; Dr. Anjali Dixit
ISBN :- 9788177868944

Share On :

Description

सामाजिक जाणिवेतून आरोग्यविषयक लिखाण करणाऱ्या डॉ. श्री. व सौ. दीक्षित यांचे हे पुस्तक पौगंडावस्थेतील मुले, त्यांचे पालक; तसेच शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त ठरावे. लैंगिकता व अश्लीलता यांचा बऱ्याचदा संबंध जोडला जातो; त्यामुळे ‘कोंबडे झाकून सूर्य उगवायचा थांबवणे’ किंवा ‘कमरेचे सोडून डोक्याला बांधणे’ असे लैंगिक शिक्षणाविषयीचे टोकाचे विचार समाजात आढळून येतात. पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी लिहिलेल्या या पुस्तकात जननेंद्रिये, स्त्री-पुरुष संबंध, पुनरुत्पादन, लोकसंख्यावाढ, लिंग सांसर्गिक रोग, एड्स तसेच संतती प्रतिबंधक साधने इत्यादींची शास्त्रीय माहिती देण्यात आलेली आहे. लेखकांच्या मते या सर्व शिक्षणाचा उद्देश मुला-मुलींमध्ये जबाबदार लैंगिक वर्तन विकसित करणे व त्यांच्या निर्णयक्षमतेचा विकास करणे हाच आहे. नैतिकता, मूल्ये या कल्पना त्रिकालाबाधित नसतात. ज्ञान मिळवणे, त्यानुसार डोळसपणे निर्णय घेणे व त्या निर्णयामुळे वाट्याला येणाऱ्या परिणामांची जबाबदारी स्वीकारणे म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकास होय. हे पुस्तक म्हणजे उघडपणे बोलल्या न जाणाऱ्या, गूढतेने-कुतुहलाने भरलेल्या अशा या विषयाबाबत सहजतेने साधलेला एक संवाद आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Laingik Shikshan | लैंगिक शिक्षण”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat