fbpx

Mala IAS Vhaychay | मला IAS व्हायचंय!

₹225

168Pages
AUTHOR :- Mukesh Kumar
ISBN :- 9789352202096
Order On Whatsapp

Share On :

Description

IAS बनण्यासाठी UPSC ही भारतातील सर्वाधिक प्रातिष्ठित परीक्षा असून जगातील अत्यंत कठीण अशा परीक्षांमध्ये तिची गणना होते. एकवेळ एव्हरेस्ट सर करणं या परीक्षेपेक्षा सोपं असेल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. किंबहुना हेच या परीक्षेचं वैशिष्ट्य आहे. पूर्ण परीक्षा आणि मुलाखत अशा तिहेरी प्रक्रियेतून ज्या विद्यार्थ्याची निवड होते होते तो विद्यार्थी निश्चितच एक प्रतिभासंपन्न विद्यार्थी असतो. या परीक्षेत विद्यार्थ्याची कधीही थेट निवड करण्यात येत नाही. पूर्व परीक्षेत असो किंवा अंतिम मुलाखतीत तुम्ही जर अपयशी ठरलात तर तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागणार हे निश्चित. कधी मुलाखतही पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे पूर्ण करणारा विद्यार्थी पुढच्या वेळी पूर्व परीक्षेत अपयशी ठरल्याचीही उदाहरणं आहेत. शॉर्टकटवर विश्वास ठेवणार्या, उतावीळ आणि गांभीय नसणार्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा नाही. इथे हवीत यशस्वी होण्याच्या निश्चयासह अभ्यास करणारी मुलं. शिस्तबद्ध पद्धतीने दृढ संकल्प करणारी मुलंच या परीक्षेत उत्तुंग यश मिळवू शकतात अर्थात, देशाला अशाच अधिकार्यांची गरज आहे. आयएएस होऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरले असा विश्वास वाटतो.

Additional information

About Author

अंजली अभय धानोरकर
उपजिल्हाधिकारी
राज्यस्तरावरील उत्कृष्ट कार्यकर्त्या म्हणून महाराष्ट्र राज्य राजपत्रित
महासंघातर्फे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार (२००६). औरंगाबाद जिल्हास्तरावरील उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून गौरव
(२०१०-११). वेरूळ महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासंदर्भात
मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र यांच्यातर्फे सत्कार (२०१२). वन खात्यात प्रतिनियुक्तीवर असताना औरंगाबाद कार्यालयाला आयएसओ
नामांकन. असे नामांकन मिळविणारे हे महाराष्ट्रातील पहिले वन कार्यालय. सन २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये
भारतीय निवडणुकांच्या इतिहासात मौलिक क्षण समाविष्ट केले. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांपासून ब्लॉक लेव्हल अधिकाऱ्यांपर्यंत तसेच मतदान पथक, सुरक्षा व्यवस्था, क्षेत्रीय अधिकारी या कामांसाठी महिलांचीच नेमणूक करण्यात आली. यावेळी उमेदवार आणि मतदान प्रतिनिधीदेखील महिलाच होत्या. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या वेरूळमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने त्यांनी हा इतिहास घडवून आणला. ‘गट्टीफू' हा बालकथासंग्रह प्रसिद्ध (१९९८). ‘मनतरंग' या ललित-लेखसंग्रहाचे तत्कालीन मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशन (२०१२). याच ललित-लेखसंग्रहातील ‘काहूर' या लेखाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव.
नामांकित वृत्तपत्रे, मासिकांमध्ये विविध विषयांवर स्तंभलिखाण तसेच
लेख प्रसिद्ध. सानेगुरुजींच्या 'श्यामची आई' या पुस्तकाचे अभिवाचन. त्याची
श्राव्य डि.व्ही.डी. प्रकाशित. विविध प्रशिक्षण संस्थांमधून शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच कॉर्पोरेट सेक्टरच्या अधिकाऱ्यांना सॉफ्ट स्किल्स ट्रेनर म्हणून प्रशिक्षण. कॉर्पोरेट विभाग, महाविद्यालये व शाळांमधून वेळोवेळी प्रशिक्षण, प्रबोधन व मार्गदर्शन. विविध कार्यक्रम, उपक्रम व समारंभांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन. आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग. निवडणूकविषयक कामकाजासंदर्भात मार्गदर्शन.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mala IAS Vhaychay | मला IAS व्हायचंय!”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat