fbpx

Mulanchya Ujjwal Bhavishyasathi | मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी

₹175

160Pages
AUTHOR :- Shrikant Chorghade
ISBN :- 9789352201747
Order On Whatsapp

Share On :

Description

एकविसाव्या शतकातल्या गॅजेटने वेढलेल्या आजच्या पिढीला खरं तर हवी ती माहिती एका क्लिकवर हजर आहे; पण इतक्या बेसुमार माहितीच्या महापुरात ओलेचिंब होऊनही अनुभवाच्या बोलीतून आलेले संस्कारच चिरकाल टिकतात.
वेळेचं महत्त्व… यशाचा उन्माद चढू न देणं… अपयशातून मार्ग काढणं… सुख म्हणजे काय? करिअरची निवड कशी करावी? माणूस म्हणून स्वत:ला कसं घडवावं? इतक्या साध्या; पण दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाच्या बाबींविषयी मुलांना मार्गदर्शन करायला कोणी वेळच काढत नाही.
प्रस्तुत पुस्तक मुलांना स्वत:ला घडवावं कसं, हे तर सांगेलच; परंतु पौगंडावस्थेतल्या मुलांशी अवघड वाटणारा संवाद सोपा कसा करता येईल, याचं नेटकं मार्गदर्शनही पालक, शिक्षकांना करेल.
आजची किशोरवयीन मुलं उद्याच्या भारताचं भविष्य आहेत. त्यांना सुजाण नागरिक बनवण्याबरोबरच जगावं कसं, हे सांगणारं पुस्तक!

Additional information

About Author

परिचय
डॉ. श्रीकांत चोरघडे
डॉक्टर श्रीकांत चोरघडे नागपूरमधील अनुभवी व लोकप्रिय बालरोगतज्ज्ञ आहेत. १९६१ साली ते डॉक्टर झाले आणि १९६४ साली त्यांनी बालरोग या विषयातील पदविका (Diploma in Child Health) प्राप्त केली. त्यानंतर गेली ५० वर्षे ते या व्यवसायात आहेत. त्यांनी मानसशास्त्र या विषयात नागपूर विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (M.A.) प्राप्त केली आहे. 'तारांगण' या नावाचं निरामय शिशू चिकित्सा केंद्र त्यांनी १९७४ साली सुरू केलेलं आहे. हा उपक्रम आजही एक आगळावेगळा उपक्रम म्हणून नागपुरात जाणला जातो. बालकांचा सर्वांगीण विकास व बालकांच्या व्यक्तिमत्त्वविकासाबहल: तसेच त्यांच्या वर्तनसमस्यांबद्दल डॉ. चोरघडे यांचा विशेष अभ्यास आहे. 'तारांगण' निरामय शिशू चिकित्सा केंद्रात त्यादृष्टीने 'उद्याची चाहूल आज' हा उपक्रम राबवला जातो.
बालकांना आजारपण येऊ नयेत या दृष्टीने पालकांना समुपदेशन केलं जातं. त्यात बालकांचा आहार केव्हा व कसा सुरू करावा, काय व किती प्रकारचे आहारघटक कशा पद्धतीने व किती प्रमाणात बालकांना दिले जावेत याविषयी मार्गदर्शन केलं जातं.
त्यांना लिखाणाची आवड असून निरनिराळ्या दैनिकातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे व त्यांची विविध विषयांवर डझनभर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'अडगुलं-मडगुलं' या पुस्तकाचा हिंदी अनुवाद 'आपका अपना नन्हा मुन्ना व इंग्रजी अनुवादही 'It's My Baby' या नावाने प्रकाशित झाला आहे. सुविद्य पत्नी डॉ. सौ. माधवी, बालरोगतज्ज्ञ; डॉ. अमित हा मुलगा आणि डॉ. सौ. गिनी प्रियंका ही सूनबाई व चि, अद्वैत हा नातू आणि नात चि. कु. ओजस्विनी असा डॉक्टरांचा छोटासा सुटसुटीत संसार. जीवनावर, संगीतावर, निसर्गावर आणि लहान मुलांवर मनापासून प्रेम करणाऱ्या या लेखकाचं वास्तव्य 'राजीव’ धरमपेठ, नागपूर-४४० ०१० या ठिकाणी आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mulanchya Ujjwal Bhavishyasathi | मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat