fbpx

Nasti Uthathev | नस्ती उठाठेव

₹225

184Pages
AUTHOR :- Pu. La. Deshpande
ISBN :- 9788177867701
Order On Whatsapp

Share On :

Description

पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांची विनोदबुद्धी. वाचकांना आपल्या विनोदांनी हसत-हसत अंतर्मुख करणे हे पु. लं. च्या विनोदाचे वैशिष्ट्य. हसणे हा ताणतणाव कमी करण्याचा, आनंद मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे. निखळ आनंद जगण्यासाठी मदत करीत असतो. पु. ल. देशपांडे यांनी आयुष्यभर आपल्या विनोदांतून आपल्याला हसवत ठेवलं.
याची प्रचिती ‘नस्ती उठाठेव’ पुस्तक वाचून येते. क्षणाक्षणाला हसवणारे खास पु. ल. शैलीतले ‘नस्ती उठाठेव’आजही वाचले तरी तितकेच ताजेतवाने वाटते.

Additional information

About Author

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. पुल बहुरूपी होते. लेखक, नाटककार, अभिनेता, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक असा अनेक भूमिका त्यांनी वठवल्या. त्यांची कीर्ती लेखक म्हणून असली तरी त्यांची गती या सर्व क्षेत्रात सारखी होती.

'गुळाचा गणपती' या 'सबकुछ पु.ल.' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते.पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले.

मुंबईत जन्मलेले पुलं पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे.
ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

पुलंनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर 20 हून अधिक आवृत्या खपल्या. त्यांच्या लोकप्रियतेचे उदाहरण व साहित्याचा कस जोखण्याचे यापेक्षा कोणते वेगळे परिमाण असू शकते?
मराठी वाडमयाचा (गाळीव) इतिहास, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची इतर विनोदी पुस्तकेही गाजली. त्यांच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती, हे त्यांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनावरूनच कळेल. त्यांनी अमेरीका, युरोप, आशियातील अनेक देश पाहिले.

त्यात त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पध्दतीने लिहिले आहेत. पूर्वरग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा , वंगचित्रे आदी प्रवासवर्णने आहेत. त्यांची नाटकेही अतिशय गाजली. वार्‍यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी ही काही नाटके आहेत.
याशिवाय त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी आपल्या सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पुलंनी केलेला अनुवाद निव्वळ अप्रतिम.

याशिवाय मनोहर माळगावकरांच्या कान्होजी आंग्रे हे ऐतिहासिक व्यक्तिचित्र रेखाटलेले अनुवादीत पुस्तकही पुलंच्या नावावर आहेत. बटाट्याची चाळ व असा मी असामी चे त्यांनी एकपात्री प्रयोगही बरेच केले. बा. भ. बोरकरांच्या कविता त्यांनी व सुनीताबाई देशपांडे यांनी एकत्र वाचण्याचे कार्यक्रमही त्यांनी केले.
पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की 'किती घेशील दो कराने' अशी त्यांची अवस्था झाली आहे. साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्‍या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nasti Uthathev | नस्ती उठाठेव”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat