fbpx

Nata Doghancha | नातं दोघांचं

₹225

208Pages
AUTHOR :- Rajendra Barve
ISBN :- 9789352200412
Order On Whatsapp

Share On :

Description

आयुष्यातील प्रत्येक स्थित्यंतराला सामोरं जाताना व्यक्ती गडबडते. गोंधळून जाते. प्रेमसंबंध, विवाह, आईवडीलपण निभावणं अशा नव्या बदलांशी जुळवून घेताना आपण कधी मार्गदर्शक पुस्तकं वाचतो, तर कधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतो. पतिपत्नीच्या नात्यात अपरिहार्यपणे येणार्या ताणतणावांच्या बाबतीत समुपदेशन करणारी व्यक्ती डॉ. राजेंद्र बर्वेंसारखी निष्णात मानसोपचारतज्ज्ञ असेल तर मग दुधात साखरच!
वास्तविक दोघांचं खाजगीपण जपणारं हे लग्न लागताक्षणी मात्र सामाजिक बनतं. ‘त्या’ दोघांच्या नात्यात आलेला गुंता कधी संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणतो, तर कधी कौटुंबिक जबाबदार्या किंवा समाजाचा दबाव दोघांच्या नात्यात बाधा आणतो. प्रस्तुत पुस्तकात उपाय करणं अशक्य वाटणार्या समस्यांची केलेली कौशल्यपूर्वक हाताळणी समस्त जोडप्यांना मार्गदर्शक ठरावी!
प्रत्येक पतीपत्नीने संग्रही ठेवावे असे पुस्तक.

Additional information

About Author

डॉ. राजेंद्र बर्वे यांनी मुंबईतील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयामधून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. एम. डी. आणि डी. पी. एम. या मनोविकारशास्त्राच्या परीक्षेमध्ये मुंबई विद्यापीठामधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. त्यांना इंडियन साइकिअॅट्रिक सोसायटीची आणि अमेरिकन कॉलेजची फेलोशिप मिळाली. मनोविकार आणि मानसिक आरोग्य या विषयावर आणि इतर विषयावर पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत; तसेच त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या वर्तमानपत्रांतून तर किलोस्कर, स्त्री, मनोहर आणि लोकप्रभा या नियतकालिकातून विपुल लेखन केले आहे. अमेरिकेतील बोस्टन येथील विद्यापीठामधून आणि न्यूजर्सी मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी कार्यशाळा चालविल्या आहेत. मुंबईतील अनेक संस्थांमधून त्यांनी व्याख्याने आणि कार्यशाळा चालविल्या आहेत.
ते 'स्ट्रेस मॅनेजमेंट' या विषयावर अनेक औद्योगिक कंपन्यांमध्ये एका दिवसाचा "Lets Talk Stress' नावाचा कार्यक्रम सादर करतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nata Doghancha | नातं दोघांचं”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat