fbpx

Bookshelf | बुकशेल्फ

₹225

208Pages
AUTHOR :- Abhilash Khandekar
ISBN :- 9788177869569
Order On Whatsapp

Share On :

Description

माहितीच्या विस्फोटात विशेषतः सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत वाचनसंस्कृती नष्ट होते आहे काय, असा प्रश्न गेल्या दशकापासून विचारला जाऊ लागला आहे. याचे कारण संगणक आणि स्मार्टफोनसारख्या साधनांमुळे दीर्घवाचनाची मेंदूची क्षमता कमी होते आहे, असे तज्ज्ञ मानू लागले आहेत. एकीकडे वाचनसंस्कृतीची चिंता व्यक्त केली जात असतानाच चांगल्या पुस्तकांना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक राहिला आहे. अर्थात कोणत्या लेखकाचे कोणते पुस्तक उपलब्ध झाले आहे, त्याची किंमत काय आणि त्यात नेमके काय आहे, याचे दिशादर्शन झाले तर त्या पुस्तकाची व वाचकाची भेट होण्याची शक्यता वाढते आणि हा व्यवहार वाचनसंस्कृतीला पुढे नेणारा ठरतो. असा हा व्यवहार पुढे नेण्याचे कार्य अभिलाष खांडेकर यांनी सातत्याने केले आणि त्यातून हे अतिशय उपयुक्त असे पुस्तक साकारले आहे

Additional information

About Author

अभिलाष खांडेकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण इंदूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. एमकॉम व राज्यशास्त्रात एमए मिळवल्यानंतर त्यांनी तत्कालीन संकुचित मध्यमवर्गीय मानसिकतेनुसार बँक वा सरकारी नोकरीच्या मागे न लागता क्रीडा पत्रकारितेत प्रवेश केला. त्यांचे मामा व पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार सदाशिव गोपाळराव पळसुले यांचा आदर्श त्यांच्यासमोर होता. ते मध्य प्रदेशातील पहिलेवहिले पूर्णवेळ व्यावसायिक क्रीडा पत्रकार होते. खांडेकरांनी विद्यार्थी जीवनात अनेक खेळांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी मध्य प्रदेश व मध्य भारताचे खोखोमध्ये, तर महाविद्यालय/विद्यापीठाचे ॲथलेटिक्समध्ये प्रतिनिधित्व केले. ते धावपटू होते व त्यांनी १०० मीटर, २०० मीटर आणि ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत भाग घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा पत्रकारितेकडे त्यांचे पाऊल वळणे नैसर्गिक मानायला हवे. मुंबईच्या 'फ्री प्रेस जर्नल' या इंग्रजी दैनिकाने इंदूर आवृत्ती सुरू केली तेव्हा ते तेथे क्रीडाप्रमुख म्हणून रुजू झाले. सुमारे दहा वर्षे क्रीडा पत्रकारिता केल्यानंतर ते राजकीय पत्रकारितेकडे वळले व 'हिंदुस्थान टाइम्स'चे प्रिन्सिपल करस्पाँडंट म्हणून तत्कालीन अखंड मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे काम करू लागले. 'हिंदुस्थान टाइम्स'च्या भोपाळ व इंदूर आवृत्त्या सुरू करताना त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे. तेथून ते 'डीएनए' या 'दैनिक भास्कर – झी टीव्ही'च्या इंग्रजी दैनिकात मुंबई येथे रुजू झाले. डीएनएतून ते हिंदी पत्रकारितेकडे वळले व ५० वर्षे जुन्या 'दैनिक भास्कर'मध्ये भोपाळच्या संपादकपदी त्यांची नियुक्ती झाली. नंतर ते काही वर्षे याच वृत्तपत्राचे मध्य प्रदेश संपादकीय प्रमुख म्हणून नऊ आवृत्त्यांचे काम पाहत होते. दैनिक भास्कर समूहाने महाराष्ट्रात 'दैनिक दिव्य मराठी' आणला, तेव्हा महाराष्ट्र संपादक म्हणून खांडेकरांनी तीन वर्षे काम पाहिले. औरंगाबाद, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, अकोला व अमरावती अशा आवृत्त्या सुरू करण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पेलली. सध्या ते दैनिक भास्कर समूहाचे राष्ट्रीय राजकीय संपादक म्हणून दिल्लीत कार्यरत आहेत. हे त्यांचे पहिलेच मराठी पुस्तक असले तरी त्यांनी 'बर्ड्स ऑफ सिरपूर' या पक्ष्यांवरील सचित्र पुस्तकाचे सहलेखन केले आहे. तसेच त्यांनी लिहिलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे राजकीय चरित्र 'शिवराज सिंह अँड द राइज ऑफ मध्य प्रदेश' नुकतेच प्रकाशित झाले आहे. खांडेकरांना वन्य जीवन व पर्यावरण या विषयांत रस असून ते मध्य प्रदेश वन्य जीवन मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पत्रकार म्हणून अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, जर्मनी, आदी अनेक देशांतून वृत्तांकन केले आहे. त्यांनी पंतप्रधानांसह जी २०, अर्थ समिट आदी जागतिक महत्त्वाच्या परिषदांच्या वृत्तांकनासाठी परदेश दौरेही केले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bookshelf | बुकशेल्फ”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat