fbpx
Free Call

Warren Buffett

₹220
192Pages
AUTHOR :- Sudhir Rashingkar
ISBN :- 9789352201822

Categories: , , Product ID: 1787

Description

खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टार्जित नफा मिळवणार्या वॉरन यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग वॉरनने यात जगावेगळं असं केलं तरी काय?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, व्यवसायजगतात सहसा दुर्मीळ असणार्या नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणार्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच वॉरनच्या यशाचं वेगळेपण आहे.
‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचार्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणार्या वॉरनकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत. त्या सार्या वाचकांसमोर अलगद उलगडणारं हे पुस्तक!
विशेष म्हणजे वॉरनने सांगितलेल्या श्रीमंत होण्याच्या १० मार्गांसह!

Additional information

About Author

डॉ. सुधीर राशिंगकर
• 'व्यवसाय व्यवस्थापन' या विषयात पुणे विद्यापीठातून “विद्या-वाचस्पती"
(पीएच.डी.) • व्यवस्थापन क्षेत्रात संशोधकांचे मार्गदर्शक म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीवत
काम. • गेली चाळीसहून अधिक वर्ष अनेक वृत्तपत्रे व अन्य नियतकालिकातून
सातत्याने विविध विषयांवर स्तंभलेखन, • ३० हून अधिक पुस्तके प्रकाशित. • काही वर्ष तंत्रज्ञ अधिकारी म्हणून कूपर इंजिनिअरिंग व टेल्को (आता टाटा
मोटर्स) मध्ये काम केल्यावर १९७५ पासून स्वतंत्र व्यवसायात कार्यरत. • उच्च तंत्रज्ञानाच्या शिक्षण व संशोधनासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री व
उपकरणांच्या विपणनाचे भारतभर व शेजारील देशांत काम. 'प्रकल्प व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काही परदेशी कंपन्यांबरोबर काम, गेली चाळीसहून अधिक वर्ष संपूर्ण भारतभर व अन्य पस्तीसहून अधिक देशांत विस्तृत भ्रमण, रोटरी इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व अन्य अनेक पदांवर काम. उत्कृष्ट कामाबद्दल रोटरी इंटरनॅशनल व रोटरी फाउंडेशनचा पुरस्कार प्राप्त. इतर अनेक सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्था-संघटनात विविध
पदांवर कार्यरत. • रोटरीचे साहित्य मराठीत अनुवादित करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल
रोटरीचे सन्मानपत्र प्राप्त. • रोटरी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. • एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध. सहा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Warren Buffett”

Your email address will not be published. Required fields are marked *