fbpx

Yashaswi Vyavasthapanachi Sutra | यशस्वी व्यवस्थापनाची सूत्रं

₹250

208Pages
AUTHOR :- Jeevan Muley
ISBN :- 9789352202423
Order On Whatsapp

Share On :

Description

एकविसाव्या शतकामध्ये व्यवस्थापन आणि त्यासंबंधीची कौशल्ये विकसित करणे आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षणसंस्थाही विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापकीय आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कॉर्पोरेट क्षेत्र, कार्यालयेही उत्तम व्यवस्थापन करू शकणाऱ्या आणि सर्जनशील विचार करू शकणाऱ्या व्यक्तींच्या शोधात आहेत. रोजगार क्षेत्रही अशाच कुशल व्यक्तींची वाट पाहत असते. वाचकमित्रांनो, तुम्हालाही या संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती फक्त तुम्ही या संधींसाठी सक्षम होण्याची.
तुम्ही या संधीचे सोने करून तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि आनंदित करण्यास उत्सुक आहातच. तुमचे हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रस्तुत पुस्तक तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल.
या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक लेखाचे एकविसाव्या शतकाशी फार जवळचे नाते आहे. सध्याच्या कार्यसंस्कृतीवर आणि कार्यानुभवावर हे लेख आधारित असल्यामुळे वाचकांना ते अधिक आपलेसे वाटतील. यामध्ये सांगितलेली व्यवस्थापनविषयक माहिती आणि कौशल्यांची गरज वाचक स्वत: आपल्या जीवनात अनुभवतील अशी खात्री आहे.

Additional information

About Author

जीवन मुळे
• महाराष्ट्र शासनाचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार.
• इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, दिल्ली या संस्थेतर्फे 'बेस्ट पॉलिटेक्निक टीचर ऑफ महाराष्ट्र स्टेट' हा पुरस्कार.
• स्वामी रामानंद तीर्थ पुरस्कार आणि ज्ञानरत्न पुरस्कार.
• स्थापत्य अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी प्राध्यापक.
• महाराष्ट्र शासनाचे राजपत्रित अधिकारी म्हणून विविध पदांवर (प्राध्यापक, विभागप्रमुख, प्राचार्य, प्रशिक्षण अधिकारी, उपसचिव-महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ) ३५ वर्षं कार्य.
• व्यवस्थापन, उद्योजकता, अध्यापन, तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर सुमारे २८० प्रशिक्षण कार्यशाळांच्या माध्यमांतून प्रशासक, व्यवस्थापक, शासकीय अधिकारी, अध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, नवउद्योजक इत्यादींना बहुमोल मार्गदर्शन. • नामांकित नियतकालिकांमध्ये सातत्याने विविध विषयांवरील लेख प्रकाशित. • वर्तमानपत्रं, मासिकांमध्ये विनोदी लेख, कविता, कथा, परीक्षण इत्यादी प्रसिद्ध.
• आजतागायत मराठी आणि इंग्रजी भाषेतील एकूण नऊ पुस्तके प्रकाशित.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Yashaswi Vyavasthapanachi Sutra | यशस्वी व्यवस्थापनाची सूत्रं”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat