Click To Chat

Uphaas Katha | उपहास कथा

₹225

144Pages
AUTHOR :- Jaywant Dalvi
ISBN :- 9788177868876
Order On Whatsapp

Share On :

Description

कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे.
मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे. वासनांचे, सुखदुःखांचे दशावतार त्यांच्या कथांत दिसतात.
आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते.
कामभावनेच्या माणसाच्या मनावर वेगवेगळा झालेला परिणाम ते अतिशय सूक्ष्मपणे रेखाटतात. गहरी प्रेम भावना हा त्यांच्या कथेचा मुख्य विषय आहे. त्यांच्या कथेत काही वेळेस वेडी, अर्धवट पात्रे येतात. जीवनातील विविध क्षेत्रातील विसंगतीचे अचूक व मार्मिक दर्शन घडवायचे व ते घडवताना वाचताना हसवीत अंतर्मुख करावयाचे ही फारच अवघड कसरत आहे व ती फार थोड्यांना साधली. त्यात दळवीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. गंभीर कथालेखनासोबत दळवींनी विनोदी लेख व कथा लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणाऱ्या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे त्यांनी लेखनातून सिद्ध केले.

Additional information

About Author

जयवंत द्वारकानाथ दळवी (जन्म : १४ ऑगस्ट १९२५; – १६ सप्टेंबर १९९४) हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले.
काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्‍न केले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Uphaas Katha | उपहास कथा”

Your email address will not be published. Required fields are marked *