Adarsha Nibandhancha Sangraha | आदर्श निबंधांचा संग्रह

₹200

200Pages
AUTHOR :- Aruna Kalaskar
ISBN :- 9789352201655

Share On :

Description

निबंध म्हणजे योग्य विचारांची अर्थपूर्ण रचना होय. विषयाच्या अनुषंगाने मनात येणारे विचार सुसंगतपणे आणि आकर्षक शैलीत मांडणे, हे एक कौशल्य आहे. ते निश्चितच प्रयत्नाने साध्य होते.
निबंधलेखनाकरिता त्या विषयाचे सखोल ज्ञान असावे लागते. हे ज्ञान अवलोकनाने, वाचनाने आणि आपापसांत चर्चा करून मिळू शकते. सुभाषिते, सुविचार, काव्यपंक्ती, लोककथा किंवा दंतकथा, वाक्प्रचार, म्हणी यांद्वारे शब्दसाज ल्यालेला निबंध उत्कृष्ट ठरतो.
प्रस्तुत पुस्तकात विविध प्रकारच्या निबंधांसोबतच बातमी, सारांश, अभिप्राय, पत्र, कथा, वृत्त व जाहिरात यांसारखे उपयोजित लेखन कसे करावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. इयत्ता नववी, दहावीच्या नव्या कृतिपत्रिकेनुसार प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे.
विद्यार्थ्यांचे लेखनकौशल्य खुलविण्यासाठी आत्मकथनपर निबंधापासून ते ललित निबंधापर्यंत सर्व प्रकार हाताळतानाच असे निबंधलेखन कसे करावे, याविषयी अनमोल सूचनांचा या पुस्तकात अंतर्भाव करण्यात आला आहे.
प्रत्येक पालक, शिक्षक व विद्यार्थ्याच्या संग्रही असायलाच हवा असा हा ‘आदर्श निबंधांचासंग्रह!’

Additional information

About Author

अरुणा कळसकर
शिक्षण : एम. ए., बी. एड.
• पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयामध्ये २८ वर्ष शिक्षिकेचा अनुभव.
• माध्यमिक शालान्त परीक्षा (इ. १० वी) हिंदी आणि मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम गेली १७ वर्षे करीत आहेत.
• सन २००८ मध्ये इ. १० वी मराठी विषयाच्या 'स्मार्ट सिरीज गाइड-गद्य विभागा’साठी लेखन.
• महाराष्ट्र मराठी अध्यापक शिक्षक संघ, सातारातर्फे शिक्षकांसाठी घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दोन वेळा बक्षिसे प्राप्त.
• पिं. चिं, म, न, पा, आंतरशालेय शिक्षक निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त.
• विविध शाळांमधून इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयासंदर्भात मार्गदर्शनपर व्याख्याने
• 'सकाळ' वृत्तपत्रातून ललित, स्फुट लेखन प्रकाशित.
• टि. म. वि. पुणे इ.९ वी बहि:स्थ परीक्षा (मराठी) पेपर सेटिंग या क्षेत्रात २८ वर्षे कार्य करून सप्टेंबर २०१५ मध्ये निवृत्त.
पुरस्कारः
• आदर्श शिक्षक पुरस्कार : पुणे म. न. पा. (१९९९)
• आदर्श शिक्षक पुरस्कार : शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ (२००५-०६)
• गुणवंत शिक्षक पुरस्कार : विशेष वेतनवाढ (२००८)
• आदर्श शिक्षक पुरस्कार : पिं. चिं. म. न. पा. (२०१०)
• निवृत्त माध्यमिक शिक्षक संघातर्फे आदर्श शिक्षकास दिला जाणारा 'कमल-गोविंद' पुरस्कार (२०१०)
• आदर्श शिक्षक पुरस्कार : संकेत कला-क्रीडा प्रतिष्ठान, पुणे (२०१४-१५)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Adarsha Nibandhancha Sangraha | आदर्श निबंधांचा संग्रह”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat