Description
पॉल रॉब्सन् हे आहेत एकांडे शिलेदार अमेरिकन नीग्रोंना समान सामाजिक आणि राजकीय हक्क मिळवून देण्याचा ध्यास घेणारे. ते आहेत एक थोर गायक, अभिनेते, क्रीडापटू, वकील आणि स्वातंत्र्ययोध्दे. त्यांचा छळ झाला, कारण ते गोऱ्या लोकांना शरण गेले नाहीत. वंश, वर्ण, राष्ट्रीयत्व आणि धर्माच्या नावाखाली लोकांवर होणाऱ्या जुलमाविरुद्ध उठणाऱ्या नीग्रोंच्या आवाजात त्यांचा सर्वात मोठा आवाज होता. स्वातंत्र्यात जगायचं असेल तर ते मिळवण्यासाठी मरायची तयारी हवी, असे ते सांगत. मानवता आणि विश्वबंधुत्वाची मशाल सतत तेवत ठेवणाऱ्या ! स्वातंत्र्याच्या या अग्रदूताला एकच चिंता आहे, सामान्य माणसांची. म्हणून हे आत्मकथन आहे. एका चिरंतन धगधत्या संवेदनशील माणसाचं. हक्कासाठी झगडणाऱ्या प्रत्येकास हे आत्मकथन प्रेरणा देईल. |
Reviews
There are no reviews yet.