fbpx

Jagprasiddha Mahila Shastradnya | जगप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ

₹175

144Pages
AUTHOR :- Priti Shrivastava
ISBN :- 9789352202218

Share On :

Description

प्राचीन काळापासून स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिलं गेलं. साहजिकच त्याचा महिलांना शिक्षणासाठी मिळणाऱ्या संधी, पर्यायाने कामासाठी होणारी निवड यांवरही प्रतिकूल परिणाम होत आला आहे. हा संघर्षाचा कालखंड फार खडतर होता हे वेगळं सांगायला नको.
मात्र संघर्षाचं हे वलय भेदून आपल्या जिद्द, चिकाटी आणि लखलखत्या कर्तृत्वानं अशा प्रतिकूल परिस्थितीवर काही महिला शास्त्रज्ञांनी खंबीरपणे मात केली आणि मानवी विकासाला नवी दिशा दिली. वैज्ञानिक मनोवृत्तीचा प्रसार व्हावा आणि आजचे विद्यार्थी तसेच भविष्यातील शास्त्रज्ञांना या पुस्तकात समाविष्ट महिला शास्त्रज्ञांच्या दृढ इच्छाशक्ती आणि परिश्रमांतून प्रेरणा मिळावी, या विश्वासावरच हे पुस्तक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या प्रत्येक भारतीयाला समर्पित केले आहे. आर्थिक अथवा इतर अडचणीदेखील महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या महिलांच्या यशात अडथळा आणू शकत नाहीत. सर्व महिला शास्त्रज्ञांचे संकलन करणे निश्चितच कठीण कार्य आहे. तरीही विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचा प्रेरणादायी परिचय या पुस्तकात देण्यात आलेला आहे. विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तबगारीचे झेंडे रोवणाऱ्या जगप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञांचे हे वेधक चरित्र.

Additional information

About Author

लेखिका परिचय
प्रीती श्रीवास्तव
जन्म : २१ एप्रिल १९७०, खांडवा (मध्य प्रदेश) शिक्षण : एम.एस्सी. जेनेटिक्स (भोपाळ विद्यापीठ), बरकतउल्लाह विद्यापीठ,
भोपाळ येथून आनुवंशिकी या विषयात डॉक्टरेटची पदवी. ___ कार्य : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधांचे सादरीकरण,
दोन पुस्तके, पाच शोधनिबंध व विविध वर्तमानपत्रे तसेच नियतकालिकांमधून वैज्ञानिक विषयांवरील लेखन प्रकाशित. आकाशवाणी तसेच दूरदर्शनवर (भोपाळ) वैज्ञानिक विषयांसंदर्भातील कार्यक्रमांचे प्रसारण आणि प्रक्षेपण. काही काळ बायोटेक्नॉलॉजीच्या
क्षेत्रात कार्य. पुरस्कार : विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी १९९७ मध्ये ज्ञान
विज्ञान समिती, सतनातर्फे (मध्य प्रदेश) “समता महिला सन्माना'ने गौरव. सध्या स्वतंत्र लेखन आणि विज्ञान विषयांवरील पुस्तके तसेच आलेखांद्वारे विज्ञानाच्या प्रसारकार्यात व्यग्र.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jagprasiddha Mahila Shastradnya | जगप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat