fbpx

Path Kambardukhi ani Sampurna Upchar | पाठ-कंबरदुखी आणि संपूर्ण उपचार

₹200

144Pages
AUTHOR :- Mangesh Panat
ISBN :- 9789352201136

Share On :

Description

प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी पाठ-कंबरदुखीच्या त्रासाला तोंड द्यावे लागलेले असते. हा त्रास टाळण्याजोगा आहे. त्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती आपण मिळवली तर आपण या समस्येतून लवकर मुक्त होऊ शकतो.
शाळा-कॉलेज-क्लासेसमधील तासंतास बैठक, बँक-कार्यालय कंपन्या अशा ठिकाणचे संगणकासमोरचे बैठे काम, शारीरिक हालचालींचा व व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल तरुण व्यक्तींनादेखील पाठ-कंबरदुखीचा त्रास उद्भवतो.
पाठ-कंबरदुखीच्या त्रासावर आजन्म नियंत्रण ठेवण्याकरिता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम, योगासने करणे तसेच झोपणे, उठणे, बसणे या हालचाली करताना चुकीच्या सवयीत योग्य बदल केल्यास खूपच फायदा होतो. याबरोबरच आहारात योग्य तो बदल केल्यास वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते आणि हाडांची ताकद वाढते.
हा बदल नेमका कसा करावा हे या पुस्तकात अत्यंत सोप्या भाषेत व सविस्तरपणे सांगितल्यामुळे सामान्य वाचकाला ते समजून प्रत्यक्ष करता येण्यासारखे आहे.
हे पुस्तक वाचकांना पाठ-कंबरदुखीच्या त्रासातून मुक्त होण्यास निश्चितच मदत करेल अशी अपेक्षा!
– डॉ. मंगेश पानट

Additional information

About Author

डॉ. मंगेश पानट
अस्थिरोगतज्ज्ञ
+ एम.बी.बी.एस. व एम.एस. शासकीय महाविद्यालय औरंगाबाद.
(सुवर्णपदकांसह). + सन २००० पासून पानट हॉस्पिटल येथे अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत.
एम.जी.एम, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे प्राध्यापक म्हणून
कार्यरत. + एम.बी.बी.एस. व एम.एस. परीक्षा विभागाचे मेडिकल काउन्सिल ऑफ
इंडियामार्फत (एम.सी.आय.) परीक्षक, + अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय कार्यशाळांत व संमेलनात सक्रिय सहभाग, + राष्ट्रीयस्तरावर अनेक वैद्यकीय शोधनिबंध प्रकाशित. + भारतीय अस्थिरोग संघटना (IOA) व मेडिकल अस्थिरोग संघटना
(AAOS) याचे मानद सदस्य. + राज्यस्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शक व वक्ते. + औरंगाबाद अस्थिरोग संघटना सचिव, + औरंगाबाद 'ब्लॅक बक्स संघटनेचे संस्थापक तसेच अनेक मॅरेथॉन
शर्यतींमध्ये सहभाग. + साकार या दत्तक मार्गदर्शक संस्थेचे सदस्य, + टेंडर केअर होम या शाळेचे व्यवस्थापकीय सदस्य, + हिमालयामध्ये अनेक वेळा यशस्वी गिर्यारोहण.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Path Kambardukhi ani Sampurna Upchar | पाठ-कंबरदुखी आणि संपूर्ण उपचार”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat