Description
वर्तमान क्षणाचा स्वीकार करणे सर्वांसाठीच अत्यावश्यक आहे.
वर्तमान क्षण वगळता तुमचे स्वतःचे असे भूत, भविष्य दुसरे काहीच नसते.
हे पुस्तक अतिशय शांत चित्ताने वाचा किंवा एकदम कोणते तरी एखादे पान उघडा आणि त्यातील शब्दांकडे किंवा शब्दांतील मोकळ्या जागेकडे बघा; कदाचित लगेच किंवा काही वेळानंतर तुम्हाला तुमचे जीवन बदलून टाकणारे काही तत्त्व आढळून येतील.
त्यामुळे तुम्हाला फक्त तुमचे जगणेच नाही तर तुमचे विश्व बदलून टाकणारी शक्ती आणि सामर्थ्य तुम्हाला सापडेल.
ती शक्ती आणि सामर्थ्य.
आता इथे आहे, या क्षणात आहे. या क्षणाचा तुम्ही उपभोग घेण्यात आहे.
जे काही आहे ते आता, इथे या क्षणात आहे, नंतर काहीच नाही.
हे सर्व फक्त तुमच्या हातात आहे. या क्षणाचे सामर्थ्य जाणून घ्या.
सुखी, समाधानी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी वर्तमान क्षणाचा योग्य प्रकारे वापर करायला शिकविण्याच्या सोप्या पद्धती समजावून सांगणारे जगातील सर्वाधिक खपाचे पुस्तक.
“आपल्या जीवनातील वर्तमान क्षणाचा परिपूर्ण वापर करण्यासाठी आणि भूतकाळ तसेच भविष्यकाळापासून मुक्तता मिळविण्यासाठी हे पुस्तक म्हणजे योग्य दस्तवेज आहे.
तुमचे विचार परिवर्तीत करण्याचे यात सामर्थ्य आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे या वर्तमानक्षणी जास्त उत्साह आणि परमोच्च आनंद मिळणे.”
– ओपरा विनफ्रे इन ओ, दि ओपरा मॅगझिन
लेखकाबद्दल :
‘द पॉवर ऑफ नाऊ’ या सर्वाधिक खपाच्या पुस्तकामुळे जागतिक दर्जाचे अध्यात्म शिक्षक म्हणून एखार्ट टॉल् यांना मान्यता मिळाली. ते सतत प्रवास करीत असतात आणि व्याख्याने देतात. त्यांच्या व्याख्यांनाना खूप मोठी गर्दी होते. जेव्हा ते प्रवास करीत नसतात तेव्हा कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियातील व्हॅनाकोव्हर येथे शांतपणे राहतात.
Reviews
There are no reviews yet.