fbpx

Vatevarlya Savlya – Geetgopal | वाटेवरल्या सावल्या – गीतगोपाल

₹375

264 Pages
AUTHOR :- G. D. Madgulkar
ISBN :- 978-9352207824

Share On :

Description

श्रीकृष्णचरित्रांतील कृष्णजन्मापासून मथुरागमनापर्यंतचा कथाभाग या पस्तीस गीतांतून गुंफला आहे. विरही राधेला स्फुरला असेल, स्मरण असेल तसा.
पुरेत गाणीं शृंगाराचीं । कृष्णसख्याच्या व्यभिचाराची ॥
असें ज्यांना खरेंच वाटतें, त्यांच्यासाठी हा प्रयत्नच नाही. राम-कृष्णांचे देवत्व ज्यांनी श्रद्धेने मानलें आहे त्यांना हीं गीतें आवडावीं. बुद्धीचे पाय जडतेशीं जखडलेले आहेत. श्रद्धेला पंख असतात. माझे मित्र श्री. जयंतराव साळगांवकर यांच्या ‘शब्दरंजन’ मासिकासाठी या गीतावलीचा प्रारंभ झाला. मासिकाचें प्रकाशन थांबलें तेव्हा माझें लेखनहि थांबलें होतें.
श्री. भा. द. खेर व श्री. वि. स. वाळिंबे या मित्रांच्या आग्रहामुळे हीं गीतें मी पुन्हा लिहूं लागलों. सह्याद्रींतून ती क्रमश: प्रसिद्ध झालीं.
आता हीं गीतें पुस्तक-रूपाने प्रकाशित होत आहेत. ‘केसरी’ प्रकाशनाचे श्री. जयंतराव टिळक यांचा मी मन:पूर्वक ऋणी आहें.
श्री. सालकरांनी चित्रें उत्तम काढलीं आहेत. त्यांचे आभार.
– ग. दि. माडगूळकर

या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी स्वत:च्या मातु.श्री, मा. विनायक, आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, वि.स. खांडेकर, बाबूराव पेंटर, सुधीर फडके आदी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दांत आणि सहज शैलीने रेखाटली आहेत. त्या-त्या परिस्थितीतील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना तर त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करुन करुण-व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर उभी राहतात.
गदिमा हे मराठी साहित्य-संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते. ऋतुपरत्वे अनेक उन्हाळे, पावसाळे, वादळे या झाडाने पाहिली आणि साहिली. तरीही हे स्वाभिमानी व कष्टाळू झाड ताठ उभे होते. असीम दारिद्य्र व अपार कष्ट अशा खडतर वाटचालीतूनही त्यांनी मराठीला काही अभिजात व कलापूर्ण चित्रपट दिले. त्यांच्या या अपूर्व देण्याबद्दल मराठी माणूस कृतज्ञ आहे. मराठी मनावर स्वत:ची एवढी दृढ-सखोल छाप ठेवणारा कलावंत विरळाच म्हणावा लागेल. आपल्या रुपाने गदिमांनी साहित्य-चित्रसृष्टीत एक वैभवशाली पर्वच निर्माण केले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vatevarlya Savlya – Geetgopal | वाटेवरल्या सावल्या – गीतगोपाल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat