fbpx

Man on Mission Maharashtra | मॅन ऑन मिशन महाराष्ट्र

₹350

296Pages
AUTHOR :- Ashish Chandorkar
ISBN :- 9789352201754

Share On :

Description

मॅन ऑन मिशन महाराष्ट्र
नागपूर महापालिकेचे सर्वांत तरुण महापौर ते महाराष्ट्र राज्याचे १८वे मुख्यमंत्री अशी देदीप्यमान कारकीर्द असणारे मा. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे राजस, कुशल तसेच चाणाक्ष व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. त्यांच्या ठायी अभ्यासूवृत्ती, नेतृत्वगुण आणि माणसं जपण्याच्या हातोटीबरोबरच राजकारणात आवश्यक असणारा संयम तसेच योग्यवेळी गरजेची असणारी आक्रमकता या गुणांचा अचूक मिलाफ आहे.
केवळ महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या फडणवीस सरकारने ग्रामीण भाग, शेती, नागरिकांचे आरोग्य, महिलांचा विकास आणि पायाभूत सुविधांची निर्मिती यांसह अनेक अभिनव संकल्पना साकारल्या आहेत.
त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला वीजजोडणी अशा योजनांनी प्रत्यक्षात आकार घेतला. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना अडीचशे कोटींहून अधिक रुपयांची मदत प्राप्त झाली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा फायदाही लाखो रुग्णांना झाला.
अशा या मुख्यमंत्र्यांविषयी आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी जाणून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न…

Additional information

About Author

आशिष चांदोरकर
गेल्या अठरा वर्षांपासून पत्रकारितेत आणि वीसहून अधिक वर्षे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेले आशिष अरविंद चांदोरकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते विद्यार्थी आहेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन अशा पत्रकारितेच्या तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवताना पुणे, मुंबई आणि हैद्राबादेत त्यांनी आपली पत्रकारितेची कारकीर्द घडवली. राजकारण, क्रीडा, सामाजिक विषय आणि खाद्यसंस्कृती हे त्यांच्या आवडीचे विषय.
चांदोरकर यांनी निवडणुकीच्या निमित्ताने केवळ महाराष्ट्र आणि गोवाच नव्हे तर गुजरात, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश येथे जाऊन वार्तांकन केले.
नेहमीच नव्या दिशेच्या आणि नव्या आशेच्या शोधात असलेल्या चांदोरकरांनी नव्या काळाचा सक्सेस पासवर्ड मानल्या गेलेल्या सोशल मीडियातही बाजी मारली आहे. त्यांचे विविध विषयांवरील ब्लॉग कायम चर्चेत असतात. महाराष्ट्र सरकारतर्फे २०१४ साली सोशल मीडियावर लेखन करणाऱ्या पत्रकारांसाठी जाहीर झालेला पहिला विशेष पुरस्कार आशिष चांदोरकर यांनी पटकावला.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Man on Mission Maharashtra | मॅन ऑन मिशन महाराष्ट्र”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat