fbpx

Wachansanskruti Lekhansanskruti | वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती

₹400

336 Pages

AUTHOR :- Suresh Sawant
ISBN :- 9789352203345

Share On :

Description

वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती’ ह्या पुस्तकात डॉ. सुरेश सावंत यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालत असलेल्या चाकोरीबाहेरच्या उपक्रमांचा संशोधनपूर्वक आढावा घेतला आहे. ह्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणप्रक्रियेतील महत्त्वाच्या आणि अलक्षित अशा दोन पैलूंकडे लक्ष वेधले आहे. शिक्षण हा डॉ. सावंत यांच्या निदिध्यासाचा विषय असल्यामुळे त्यांनी हे लेखन अतिशय समरसून, आत्मीयतेने आणि जिवीच्या जिव्हाळ्याने केले आहे.
पारंपरिक अर्थाने ही बालसाहित्याची समीक्षा नसून ह्या पुस्तकात डॉ. सावंत यांनी बालसाहित्य आणि बालशिक्षण यांचा आंतरिक अनुबंध अधोरेखित केला आहे. त्यांनी अभ्यासपूर्वक नोंदविलेली निरीक्षणे ह्या दोन्ही क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरतील, अशीच आहेत.
डॉ. सावंत हे सर्जनशील आणि आनंददायी शिक्षणाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी आपल्या तीन तपांच्या शैक्षणिक कारकिर्दीत जे अभिनव उपक्रम कार्यान्वित केले, तेच ह्या पुस्तकाचे भक्कम अधिष्ठान असल्यामुळे ‘आधी केले, मग सांगितले’ असे ह्या लेखनाचे प्रेरणादायी स्वरूप आहे.
वाचनसंस्कृती आणि लेखनसंस्कृतीच्या विकासासाठी धडपडणाऱ्या सेवाव्रती शिक्षकांच्या प्रयत्नांना बळ देणारे आणि शिक्षणक्षेत्राशी संबंधित सर्वच घटकांच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारे हे पुस्तक मृतप्राय होत चाललेल्या शिक्षणप्रक्रियेत प्राण फुंकण्यासाठी संजीवक ठरेल, असा विश्वास वाटतो.

Additional information

About Author

डॉ. सुरेश गोविंदराव सावंत
जन्मदिनांक : १ जानेवारी १९६०
शिक्षण : एम. ए. (मराठी); एम. एड्., डी.एल.एल., पीएच.डी. पीएच.डी. प्रबंध विषय : श्रीमती शांता शेळके यांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास.

विशेष उल्लेखनीय :
शिक्षणक्षेत्रातील अतुलनीय व समर्पित योगदानाबद्दल भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार. सर्वोदय आश्रम, नागपूर या संस्थेतर्फे कै. मामा क्षीरसागर स्मृती ‘आचार्य’ पुरस्काराने सन्मानित. कै. भारत गव्हाणे शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड या संस्थेतर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित. नांदेड जि.प.तर्फे ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात येणारा दीड लक्ष रुपयांचा नरहर कुरुंदकर पुरस्कार प्राप्त. प्रकाशित पुस्तके :
अबोली (कवितासंग्रह), दुभंग (कवितासंग्रह), आपण सारे भाऊ भाऊ (किशोर कादंबरी), अंधार गेला उजेड आला (किशोर कादंबरी), … आणि हत्तीचे पंख गळाले (बालकथासंग्रह), संत दासगणू महाराज (चरित्र), राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज (चरित्र), गुरू गोविंदसिंह (चरित्र), गरिबांचा कैवारी : बाबुराव यादव (चरित्र), हिरवे हिरवे झाड (बालगीतसंग्रह) जांभुळबेट (बालगीतसंग्रह), नवप्रभा (संपादित काव्यसंग्रह), भुताचा भाऊ (बालगीतसंग्रह), बालकनीती (बालगीतसंग्रह), यशस्विनी (डॉ. श्रीमती विनोदिनी गायकवाड यांच्या आत्मचरित्राचे शब्दांकन), मराठवाड्याचा विकास : दिशा आणि गती या संपादित शंकरराव चव्हाण गौरवग्रंथाचे सहसंपादक, काठीचा घोडा (बालगीतसंग्रह), पळसपापडी (बालगीतसंग्रह), कॉमिक्सच्या जगात (बालगीतसंग्रह), एका जनार्दनी (एकांकिका), रानफुले (बालगीतसंग्रह), श्रेष्ठ भारतीय बालकथा या ग्रंथात पाच अनुवादित आणि एक स्वतंत्र बालकथा समाविष्ट. महाराष्ट्राचे शिल्पकार : शंकरराव चव्हाण (संशोधन) प्रत्ययाचे प्रांत (समीक्षालेखसंग्रह), सर्जननामा (डॉ.जे.जी. वाडेकर यांच्या आत्मचरित्राचे संपादन) कर्मयोगी (डॉ.जे.जी. वाडेकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रकाशित गौरवग्रंथाचे संपादन) श्रेष्ठ हिंदी बालकथा (अनुवादित), धुनी (कवितासंग्रह) पुरुषोत्तमाच्या कविता (कै. पुरुषोत्तम पांडे यांच्या कवितेचे संपादन व संशोधन) जलशंकर (शंकरराव चव्हाण यांचे चरित्र) सूर्यमुद्रा प्रा. उत्तमराव सूर्यवंशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रकाशित गौरवग्रंथाचे संपादन. माझा शिक्षक : चरित्रनायक (शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शिक्षकांच्या चरित्रलेखांचे संपादन.) एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य : बालसमीक्षकांच्या नजरेतून (संपादन) भगवान अंजनीकर यांचे बालसाहित्य : बालवाचकांच्या नजरेतून (संपादन) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (चरित्र) सहकारपद्म (कै.) पद्मश्री श्यामरावजी कदम स्मृतिग्रंथाचे संपादन युद्ध नको बुद्ध हवा (किशोरांसाठी कविता), नदी रुसली! नदी हसली! (बालकुमारांसाठी कविता) ना.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आधुनिक भगीरथ ह्या गौरवग्रंथाचे संपादन. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई अक्षरयात्री (समीक्षालेखसंग्रह) गुगलबाबा (बालकुमारांसाठी कविता) डॉ. सुरेश सावंत यांच्या एकसष्टीनिमित्त ४१६ पृष्ठांचा आचार्य हा गौरवग्रंथ प्रकाशित (संपादक : संदीप काळे, मुंबई. प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Wachansanskruti Lekhansanskruti | वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat