Warren Buffett | Share Bazaratun Paise Kase Kamvave?

₹430

376 Pages
AUTHOR :- Pradeep Thakur, Mahesh Chandra Kaushik
ISBN :- 978-9352205516

Share On :

Description

खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या

रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं…
लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं…
ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन…
जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही.
सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू.

व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत.
त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे.
त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.

————————————————————————————————————————–

किरकोळ गुंतवणूकदाराला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. लेखक महेश चंद्र कौशिक यांनी गुंतवणुकीशी संबंधित विविध पैलूंची माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मांडली आहे.
केवळ 100 डॉलर्सची गुंतवणूक वीस वर्षांत 7,18,03,722 डॉलर्स कशी होऊ शकते हे या पुस्तकातून जाणून घ्या.
प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा कमावण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व छोट्या व मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार सांगितले आहे.
याचा वापर करून तुम्ही शेअर बाजारातील नुकसान टाळू शकता. या पुस्तकात देण्यात आलेले शेअर बाजारातील सिद्धांत अभ्यासून व त्यांचा वापर करून तुम्हीदेखील भरघोस उत्पन्न मिळवू शकता आणि शेअर बाजारातील आपले यश निश्चित करू शकता.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Warren Buffett | Share Bazaratun Paise Kase Kamvave?”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat