Description
सदर पुस्तकामध्ये अनेक व्यवसायांतील व विविध क्षेत्रांतील ज्यांच्या यशोगाथा सर्वांना ज्ञात आहेत, अशा महान आणि दिग्गज व्यक्तींच्या यशाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विजयी माणूस कसा घडतो? हा प्रश्न ज्या महान माणसाने प्रथम विचारला, तो म्हणजे नेपोलियन हिल. हा जगातल्या दिग्विजयी माणसांच्या यादीत खूप वरच्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
यशस्वितेचे प्रसिद्ध मंत्र सांगणाऱ्या या शिक्षकाने स्वत:चे नशीब आणि आयुष्यातल्या अपार कष्टांचा फार मोठा भाग ‘यशस्वितेच्या नियमांचे’ तत्त्वज्ञान तयार करण्यासाठी खर्च केला.
हे सगळं साध्य करण्यासाठी त्याने जगातील यशस्वी माणसांच्या गळ्यात विजयाची माळ घालणाऱ्या त्यांच्या विशिष्ट श्रद्धा व त्यांचे कर्तृत्व यांचा शोध घेतला. नेपोलियन हिल यांनी यशस्वितेच्या एवं गुणविशिष्ट अशा १७ तत्त्वांचा शोध लावून, त्या तत्त्वांविषयी सखोल आणि तपशीलवार लिखाण केले.
यशस्वितेचं चैतन्यमयी प्रकाश देणारं हे लिखाण त्यांनी नंतर संक्षिप्त स्वरूपात आणलं; जेणेकरून ज्यांना जागृत होऊन विजयी व्हायचंच आहे त्यांना ते सहज हाताला लागेल. त्याचा परिणाम म्हणजे यशस्वितेकडे नेणारी जादूई शिडी.
————————————————————————————————————————-
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं…
लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं…
ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन…
जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही…
सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू.
व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत.
त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे.
त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.
Reviews
There are no reviews yet.