Bharatratna Vijete Shastradnya | भारतरत्न विजेते शास्त्रज्ञ

₹100

112Pages
AUTHOR :- D. V. Jahagirdar
ISBN :- 9789352200160

Share On :

Description

भारतरत्न हा भारत सरकारतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या व्यक्तीने कुठल्याही क्षेत्रात प्रदान केलेली असाधारण सेवा किंवा कर्तृत्व आणि मानवी आयुष्य उज्ज्वल करण्यासाठीचे त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला जातो.

हे पुस्तक म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रातील अशा तीन भारतरत्नांची साद्यंत ओळख आहे.

“स्पर्धा ही राष्ट्राच्या आर्थिक समृद्धीची ताकद असते. ज्ञानाच्या सामर्थ्याने स्पर्धा निर्माण होते आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व संशोधनामुळे ज्ञान निर्माण होते.”
– डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

“आपली अपयशी वृत्ती सोडा, विजयाचा ध्यास धरा. सत्तेच्या मोहाचा त्याग करा. ‘विज्ञान… आणखी विज्ञान, संशोधन… आणखी दर्जेदार संशोधन’ हा मंत्र जपा.”
– सर सी. व्ही. रमन

“विज्ञानाची शिडी अध्यात्माच्या शिडीसारखी उंच उंच जाणारी असते. तिची लांबी अनंत आहे, तिच्यापुढे आपण क्षुल्लक आहोत ही जाणीव ठेवल्यानेच अपेक्षित नम्रता आपल्या ठाई येईल.”
– डॉ. सी. एन. आर. राव

Additional information

About Author

डॉ. दत्तात्रय व्यंकटेश जहागीरदार
१९५८ मध्ये नागपूर विद्यापीठातून एम.एससी.ची पदवी घेतल्यानंतर त्याच वर्षी शासकीय पदव्युत्तर महाविद्यालय रायपूर (म.प्र.) येथे अधिव्याख्याता म्हणून नेमणूक. १९६३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात व्याख्याते म्हणून नियुक्ती, तेथेच १९९७ मध्ये प्रोफेसर म्हणून निवृत्ती, चौदा विद्यार्थ्याना पी.एचडी. मार्गदर्शन, ९० संशोधनपत्रिका प्रसिद्ध. जार्जिया स्टेट युनि. अटलांटा व युनि. ऑफ डेलावेअर या अमेरिकेतील विद्यापीठात पदव्युत्तर संशोधन, फिनलंड येथील टुर्के विद्यापीठात अतिथी प्राध्यापक, महाराष्ट्र शासनाचा 'आदर्श शिक्षक' हा बहुमान १९९६ मध्ये मिळाला.
विज्ञानकथा लेखक म्हणून लेखन दिवाळी अंकात, तसेच पुस्तके प्रसिद्ध, आतापर्यंत सहा विज्ञान कथासंग्रह प्रसिद्ध, शिवाय 'साकेत प्रकाशन'तर्फे मे २००७ ला 'स्टिफन हॉकिंग' व ऑगस्ट २००७ ला 'शाब्बास सुनीता' ही पुस्तके प्रकाशित, नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्लीतर्फे एक रसायनशास्त्रावरील पुस्तक प्रसिद्ध, निवृत्तीचा काळ लेखन, वाचन व नातवंडांशी खेळणे, यात कसा गेला ते समजलेच नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bharatratna Vijete Shastradnya | भारतरत्न विजेते शास्त्रज्ञ”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat