fbpx

51 Preranadayi Charitrakatha | 51 प्रेरणादायी चरित्रकथा

₹225

216Pages
AUTHOR :- Jaiprakash Zende
ISBN :- 9788177868814
Order On Whatsapp

Share On :

Description

या पुस्तकात अशा काही गोष्टी, अशी काही माणसं आपल्याला भेटतील ज्या गोष्टी, जी माणसं आपल्याला बलवान बनवून आपल्यात समृद्ध जीवनाचा अंकुर रुजवतील. आपला आत्मसन्मान आपणच राखू शकतो, असा दिलासा लेखकाने या पुस्तकातून दिला आहे. पुन्हा पुन्हा वाचावे वाटेल असे शब्दांकन आणि आयुष्य समृद्ध करणारे प्रबळ विचार हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य होय. जीवन समृद्ध करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व व्यक्तींना हे पुस्तक नवनीतसारखे मार्गदर्शक ठरेल.

Additional information

About Author

जयप्रकाश भालचंद्र झेंडे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. टाटा मोटर्स या जनप्रसिद्ध वाहन उद्योगात त्यांनी तीस वर्षे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यात प्लॅनिंग, कास्टिंग आणि इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग या विभागांचा समावेश होता. या काळात भारतात नवीनच आलेल्या कायझेन, सजेशन स्किम, क्वालिटी सर्कल, फाइव्ह एस अशा आपल्या कामात निरंतर सुधारणा करणाऱ्या जपानी कार्यपद्धतीत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
निवृत्तीनंतर आता ते औद्यागिक सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत. आतापर्यंत भारतातील अनेक प्रसिद्ध संस्थांमधून सुमारे १५०० या वर कार्यशाळा घेऊन २५,००० अधिकारी आणि कामगारांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. त्यांना लेखनाचा छंद आहे. यातूनच त्यांनी अनेक दैनिके आणि नियतकालिकांतून सुमारे २५० लेख लिहिले आहेत. त्यांच्या लेखनाचे , विषय सर्वसाधारणपणे स्वतःत आणि संस्थेत सुधारणा कशी घडवून आणता येईल याच्याशी निगडित असतात. त्याचबरोबर आतापर्यंत त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांना आतापर्यंत १) इन्सान या राष्ट्रीयपातळीवर काम करणाऱ्या संस्थेकडून जीवनगौरव', २) इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटकडून 'प्राइड ऑफ इंदिरा' आणि ३) इंटरनॅशनल बुक हाउस, दिल्ली यांच्याकडून 'बेस्ट सिटिझन ऑफ इंडिया' हे सन्मान मिळाले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “51 Preranadayi Charitrakatha | 51 प्रेरणादायी चरित्रकथा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat