fbpx

Manachya Shaktine Swatahala Badala | मनाच्या शक्तीने स्वत:ला बदला

₹150

144Pages
AUTHOR :- Sachin Deshmukh
ISBN :- 9789352200801

Share On :

Description

‘मुले आजकाल ऐकतच नाहीत’, ‘तिथे गेले ना की, अंगावर काटाच येतो’, ‘त्याला पाहिले की, तिडीक उठते मस्तकात’ अशा नकारात्मक विचारांनी, शंकांनी ग्रासले आहात का?
मनात एक असते आणि तुम्ही भलतेच वागता का? इतरांवर विसंबून राहण्याइतके तुम्ही दुबळे आहात का? इतरांवर अकारण राग बरसतो, त्यांना दुखावता आणि स्वत:देखील दु:खी होता का?
उमजत असूनही चुकीचे पाऊल उचलता का?
माझी स्मृती म्हणजे नक्की काय?
स्मृती, विचार व त्याचबरोबर उलगडत जाणार्या भावनांचा परस्परसंबंध काय आहे?
अशा अनेक शंका, प्रश्न, विचार या सर्वांचे यथार्थ, व्यवहार्य आणि शास्त्रीय स्पष्टीकरण, त्याचबरोबर स्वत:ला बदलण्याचा साधा, सोपा आणि सहज मार्ग पुस्तकात मांडलेला आहे.
हे पुस्तक वाचकाला नैराश्य व ताणतणावावर मात करायला शिकवते, तसेच मन:शांती, आरोग्य,
आदर्श पालकत्व, सुखी वैवाहिक जीवन आणि
सशक्त नातेसंबंध जोपासण्यासाठी मार्गदर्शक ठरते.
वाचकाला स्वत:च्या स्वभावात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आणि तनामनाच्या आरोग्यासाठी
हे लेखन उत्तम टॉनिक ठरेल.
डॉ. जयंत बरिदे

Additional information

About Author

डॉ. सचिन देशमुख
एम. डी. २३ वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ व सोनोलॉजिस्ट म्हणून प्रेक्टिस.
२०१० पासून मनोकायिक रुग्णांचे समुपदेशन. • विविध कार्यशाळा, व्यावसायिक कार्यक्रम, पुस्तके आणि
शिबिरांद्वारे रॅशनल मेमरी थेरपी (RMT) चा प्रसार. विविध मनोकायिक आजार, पॅनिक अटॅक डिप्रेशन (नैराश्य) यांचा अभ्यास करून 'बायोमेकॅनिक्स ऑफ ह्यूमन माइंड अॅण्ड बॉडी' हे शास्त्र व रॅशनल मेमरी थेरपीवरील उपायाचा शोध.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Manachya Shaktine Swatahala Badala | मनाच्या शक्तीने स्वत:ला बदला”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat