fbpx

Mantarlele Divas – Geetgopal | मंतरलेले दिवस – गीतगोपाल

₹425

272 Pages
AUTHOR :- G. D. Madgulkar
ISBN :- 978-9352207817

Share On :

Description

श्रीकृष्णचरित्रांतील कृष्णजन्मापासून मथुरागमनापर्यंतचा कथाभाग या पस्तीस गीतांतून गुंफला आहे. विरही राधेला स्फुरला असेल, स्मरण असेल तसा.
पुरेत गाणीं शृंगाराचीं । कृष्णसख्याच्या व्यभिचाराची ॥
असें ज्यांना खरेंच वाटतें, त्यांच्यासाठी हा प्रयत्नच नाही. राम-कृष्णांचे देवत्व ज्यांनी श्रद्धेने मानलें आहे त्यांना हीं गीतें आवडावीं. बुद्धीचे पाय जडतेशीं जखडलेले आहेत. श्रद्धेला पंख असतात. माझे मित्र श्री. जयंतराव साळगांवकर यांच्या ‘शब्दरंजन’ मासिकासाठी या गीतावलीचा प्रारंभ झाला. मासिकाचें प्रकाशन थांबलें तेव्हा माझें लेखनहि थांबलें होतें.
श्री. भा. द. खेर व श्री. वि. स. वाळिंबे या मित्रांच्या आग्रहामुळे हीं गीतें मी पुन्हा लिहूं लागलों. सह्याद्रींतून ती क्रमश: प्रसिद्ध झालीं.
आता हीं गीतें पुस्तक-रूपाने प्रकाशित होत आहेत. ‘केसरी’ प्रकाशनाचे श्री. जयंतराव टिळक यांचा मी मन:पूर्वक ऋणी आहें.
श्री. सालकरांनी चित्रें उत्तम काढलीं आहेत. त्यांचे आभार.
– ग. दि. माडगूळकर

गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरणरंजनात्मक; परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना ‘त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती’, असे गदिमांनी म्हटले आहे. ते सारे दिवस मंतरलेले होते. अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते, जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते, असा भाव या संग्रहातल्या लेखांतून व्यक्त होतो. निवेदनातला ऐसपैसपणा आणि खुलेपणा त्यांच्या उमद्या स्वभावावर प्रकाश टाकतो.
ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन विलोभनीय असून त्यातला ताजेपणा, भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो. त्यांच्या भाषेतला ओढा, चित्रमयता आणि नादमधुरता वाचकाला गुंगवून टाकते. व्यक्ती, प्रसंग, घटना जिवंत करणारी सर्जक प्रतिभा मनाला भावते.
गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.
– अविनाश सप्रे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mantarlele Divas – Geetgopal | मंतरलेले दिवस – गीतगोपाल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat