fbpx

Panpasara | पाणपसारा

₹225

216Pages
AUTHOR :- Vijay Diwan
ISBN :- 9789352201228

Share On :

Description

आज लोकसंख्या बेसमार वाढलेली आहे. त्या प्रमाणात पाण्याची गरजही वाढलेली आहे. परंतु जलस्रोत मात्र पूर्वीपेक्षा कमी झालेले आहेत. पृथ्वीवर गोडे पाणी अत्यंत थोडे आहे, ते अमर्याद नाही. जे काही पाणी उपलब्ध आहे, त्याची व्यवस्था अत्यंत गुंतागुंतीची आहे. ती एकूण व्यवस्था पाण्याचे बाष्पीभवन, मेघनिर्मिती, पृष्ठीय तापमान, पर्जन्यमान यांवर अवलंबून असणारी, गुंतागुंतीची, आणि परस्परावलंबी आहे. तिच्यावर टोकाचे मानवी आघात झाले, तर ती व्यवस्था कोलमडून पडू शकते.
खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण, हवामान बदल आणि सर्वच स्तरांवर जलसंघर्षांच्या संख्येत तीव्रतेत निरंतर होत असलेली जीवघेणी वाढ या व्यापक पार्श्वभूमीवर ‘पाणपसारा’ हे पुस्तक पाण्यावर नेमकेपणाने प्रकाशझोत टाकते. लोकाभिमुख व शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेली अभ्यासपूर्ण मांडणी आणि सुस्पष्ट विश्लेषण हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
मोठ्या धरणांना विरोध आणि लोकसहभागावर आधारित पर्यावरण-स्नेही विकेंद्रित जलविकासाचा आग्रह हे ‘पाणपसारा’च्या मांडणीचे मध्यवर्ती सूत्र आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Panpasara | पाणपसारा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat