Description
कोणाच्या जाण्याने जीवन थांबत नसतं. जगरहाटी सुरूच असते. कदाचित पूर्वीपेक्षाही जास्त सुखसमृद्धी आलेली असते. एकाचे अकरा झालेले असतात; पण स्त्रीच्या जीवनात एकाट्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अकरानेही भरून निघत नाही. तिच्या संसाराचा सारीपाट उधळलेला असतो. जोडीदार अर्धा डाव टाकून गेलेला असतो अन् तिच्या हातात उरलेल्या असतात फक्त आठवणींच्या सोंगट्या. ती त्याच्याशीच खेळत असते शेवटपर्यंत.
‘स्मरणाचे इंद्रधनू’ हे पुस्तक अशाच संस्मरणीय आठवणींचा संग्रह. कविवर्य मधुकर केचे आणि त्यांच्या पत्नी मुक्ता मधुकर केचे यांच्या सहजीवनाचा हा कोलाज. यशाचे शिखर पादाक्रांत करीत असतानाही कुठलाच गर्व न बाळगणारे मधुकर केचे पत्नीला सांगत असत की, “कधीही कनक, कामिनी आणि कीर्ती या तीन गोष्टींच्या मागे धावू नये. आपले कार्यच असे पाहिजे की, त्यांनी आपल्या मागे धावावे.”
हे संपूर्ण लेखनच मुळी मधुकर केचे यांच्याशी निगडित स्मृतिकोशावर आधारित आहे. त्यांच्या आठवणींचा ठेवा मुक्ता केचे यांनी आपल्या कलात्मक लेखणीतून अपूर्ण लालित्यासह वाचकांसमोर मांडला आहे.
Reviews
There are no reviews yet.