Description
“लहानपणी आपण अनेक नवनव्या गोष्टी पाहत असतो, अनुभवत असतो; पण तेव्हा त्यांचं स्वत:च्या आयुष्यातलं किंवा समाजाच्या जडणघडणीतलं महत्त्व आपल्याला नीट कळत नसतं. अर्थात, तसं ते कळण्याचं वयही नसतं. मात्र त्यावेळचे ते अनुभव मनावर कायमस्वरूपी कोरले जातात आणि त्यातला कार्यकारणभाव आयुष्यातील पुढच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला उलगडत जातो. माझ्या बाबतीतही असंच झालं. देश त्यावेळी नुकताच प्रजासत्ताक झाला होता. उत्साहाचं नवं वातावरण पसरलं होतं. माधवनं प्रशासकीय सेवेतच जावं असा घरच्या वडीलधाऱ्या मंडळींचा आग्रह होता. वडिलांजवळ आणि माझ्याजवळ ते तसं बोलूनही दाखवत. दरम्यान, पंचवार्षिक योजनेची नवी संकल्पना त्यावेळी वृत्तपत्रांतून वारंवार चर्चेत असे. विकासाची नवी आणि महत्त्वाकांक्षी दालनं आता उघडणार आहेत, असं मलाही जाणवू लागलं होतं. त्यातूनच माझ्या मनातली स्थापत्य अभियांत्रिकीची ओढ हळूहळू पक्की होत गेली आणि पुढे लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून निवड झाल्यावर आयुष्यात जलतरंग उमटले ते कायमचेच.”
Reviews
There are no reviews yet.