Manache Vyavasthapan | मनाचे व्यवस्थापन

₹250

272Pages
AUTHOR :- Chandrashekhar Pande
ISBN :- 9789352200108

Share On :

Description

शारीरिक स्वास्थ्य हे आपल्या मनाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असतं. मानवी सुख-दु:ख आणि वैयक्तिक परिणामकारकता निर्धारित करण्यात परिस्थिती नव्हे, तर त्याकडे बघण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. माणसाच्या आयुष्यात भावना आणि त्यांच्याशी निगडीत त्याच्या वर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. प्रेम, आनंद, विनोद इ. भावना जगण्यातलं सुख वाढवतात; पण त्यांचा अतिरेकही घातकच असतो. म्हणूनच निसर्गाने भीती, राग, विषण्णता, शोक अशा नकारात्मक भावनाही माणसाच्या मागे लावल्या असाव्यात. या भावना व्यक्तीला अस्वस्थ करतात, व्यक्तीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करतात. तेव्हा या भावनांचे गुलाम न बनता त्यांचं म्हणजेच मनाचं व्यवस्थापन कसं करायचं हे सांगणारं मार्गदर्शक पुस्तक.
समुपदेशक, अधिकृत आरईबीटी मानसोपचारतज्ज्ञ. 50 वर्षांहूनही अधिक काळ मानसशास्त्र क्षेत्रात कार्य. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, लेखक आणि आरईटीचे (रॅशनल इमोटिव्ह थेरपी) जनक डॉ. अल्बर्ट एलिस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आणि आरईबीटी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मान्यता प्राप्त. स्थिरपणे आणि यशस्वीपणे शैक्षणिक क्षेत्रातही कार्य. समाजातील अंधश्रद्धेच्या प्रश्नाबाबत कृतिशील असणारे लेखक, समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ.

Additional information

About Author

डॉ. चंद्रशेखर गणेश पांडे
जन्म : १९५८ : १९६० : १९७४ : अध्यापन:
५ एप्रिल, १९३७ बी. ए. एम. ए. मानसशास्त्र (पुणे विद्यापीठ) पीएच.डी. (नागपूर विद्यापीठ) १९६०-६२ : फर्ग्युसन कॉलेज, पुणे १९६२-६४ : चाळीसगाव कॉलेज १९६४-९७ : अधिव्याख्याता, पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ १९८२-८३ : युसेफीची फेलोशिप घेऊन न्यूयॉर्कच्या आरईटी इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. अल्बर्ट एलिस यांच्या मार्गदर्शनाखाली आरईटीचे प्रशिक्षण अधिकृत आरईबीटी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मान्यताप्राप्त • ५ पुस्तके व ५० च्यावर संशोधनपर लेख. • १२ पीएच. डी, प्रबंधांचे मार्गदर्शन, .१९७५-९० : अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचे कार्य व संबंधित चळवळीचे नेतृत्व. • वैयक्तिक मानसोपचाराशिवाय वेगवेगळया समस्यांवर गटनिहाय कार्यशाळा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Manache Vyavasthapan | मनाचे व्यवस्थापन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat