Bharatiya Shikshansanskrutiche Shilpakar | भारतीय शिक्षणसंस्कृतीचे शिल्पकार

₹350

256 Pages
AUTHOR :- Sachin Usha Vilas Joshi
ISBN :- 978-9352203802

Share On :

Description

शिकणारे बालक हा विषय केंद्रस्थानी ठेवून शिक्षणाचा वैचारिक इतिहास आपण या पुस्तकातून जाणून घेऊ शकतो.
शिक्षणाचे स्वरूप कसे असायला हवे हे विविध ज्ञानोपासकांच्या उदाहरणांद्वारे या पुस्तकात सांगितले आहे.
‘प्रश्न विचारा’, ‘वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा’, ‘जिज्ञासा निर्माण करा’, ‘विचार हाच शिक्षणाचा पाया असतो’ अशी अनेक पथदर्शक विचारविधाने या पुस्तकात ठिकठिकाणी उद्धृत केलेली आहेत. – प्रा. रमेश पानसे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
रवींद्रनाथ टागोर, ओशो, संत रामदास अशा अनेक विचारवंतांविषयी आपण वाचतो; पण आपल्याला त्यांच्यातील शिक्षक ओळखता येत नाही.
सचिन जोशी यांना नेमकेपणाने या महापुरुषांमधला शिक्षक सापडलेला आहे.
त्यांचे मार्गदर्शक विचार लेखकाने साध्या, सोप्या भाषेत आपल्यासमोर आणले आहेत.
त्यातून शिक्षण काय नि कोणतं घ्यायला हवं हे ते सांगतात. – संदीप वासलेकर, आंतरराष्ट्रीय विचारवंत
आजच्या शैक्षणिक धोरणातील बहुतांश मुद्द्यांची पाळेमुळे संतांच्या तसेच समाजसुधारक आणि विचारवंतांच्या विचारांमध्ये दडलेली आहेत याची जाणीव करून देणारे श्री. सचिन जोशी यांचे हे पुस्तक या पार्श्वभूमीवर निश्चित स्वागतार्ह आहे.
देश उभारणीमध्ये हातभार लावणाऱ्या घटकांना घडवण्याचे काम शिक्षक प्राथमिक शाळेपासूनच करतात.
या लेखांचा परिपाक म्हणून जर आजचे शिक्षक हे प्रेम, ज्ञान आणि तटस्थता या गुणांनी परिपूर्ण झाले तर उद्याचा भारत निश्चितच जगातील महासत्ता होईल. – सूरज मांढरे (भाप्रसे), शिक्षण आयुक्त

Additional information

About Author

शिक्षणक्षेत्रात मूलभूत बदल करण्याच्या हेतूने सचिन जोशी यांनी शिक्षणक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. शाळेत असताना नेहमी ‘अप्रगत विद्यार्थी’ म्हणून शिक्का बसलेल्या सचिन सरांनी पुणे विद्यापीठाच्या विविध विषयांत पोस्ट ग्रॅज्युएशन करून 7 विविध पदव्या घेतल्या आहेत; पण एकही दिवस नोकरी न करता त्यांनी सर्वप्रथम पुणे इथे ‘नापासांची शाळा’ निर्माण केली.
अतिशय कमी वयात त्यांनी शिक्षणक्षेत्रात नवनवीन संकल्पना रुजवल्या. जिथे शिक्षण पोहोचू शकत नाही, तिथे शिक्षण पोहोचविण्यासाठी त्यांनी समाजकार्याच्या माध्यमातून भारतातील पहिली ‘फिरती शाळा’ बनविली.
‘चाकं शिक्षणाची’ या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक, संचालक असून झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांसाठी फिरत्या शाळेच्या माध्यमातून ते "Support Class' चालवतात. या फिरत्या शाळेला ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
‘शाळाबाह्य’ मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी "Every Child Counts Campaign' सुरू केलं आहे. आतापर्यंत 9,500 हून अधिक मुलांना त्यांनी शिक्षणप्रवाहात आणलं असून झोपडपट्टीमधील 300 विद्यार्थिनींचं शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारलं आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bharatiya Shikshansanskrutiche Shilpakar | भारतीय शिक्षणसंस्कृतीचे शिल्पकार”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat