Description
लोकप्रिय वक्ता कसे व्हावे? हे या व्यवहार्य, सुगम आणि मौल्यवान मार्गदर्शकातून जाणून घ्या हे पुस्तक तुम्हाला व्यवहार्य आणि आचरणात आणण्याजोगे सोपे उपाय सांगते, ज्यांच्या मदतीने तुम्ही लोकांसमोर उत्तम प्रकारचे भाषण करू शकाल आणि प्रारंभापासूनच श्रोत्यांचे लक्ष वेधून घेऊ शकाल.
प्रस्तुत पुस्तकात डेल कार्नेगी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या वक्त्यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचे विश्लेषण करतात- थेट अब्राहम लिंकनपासून ते रुझवेल्टपर्यंत. भाषणकलेसाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व ठसवण्यासाठी लेखकाकडून सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणारे प्रसंग आणि निवडक उदाहरणांचे दाखले दिले आहेत. काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आणि पर्वतासारखी अचल खालील तत्त्वे तुम्हाला मदतीचा हात देतील : संयम आणि आत्मविश्वास मिळवा स्मरणशक्ती तल्लख करा भाषणाची सुरुवात परिणामकारक आणि शेवट छाप पाडणारा करा श्रोत्यांच्या मनात उत्सुकता जागवा शत्रुत्व न मिळवता वादविवादात जिंका व्यावसायिक प्रशिक्षक असलेल्या लेखकाच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचे सार या पुस्तकातून समजून घ्या. तुमचा आत्मविश्वास परत मिळवा आणि लोकांसमोर भाषण करण्याच्या भीतीवर नियंत्रण मिळवा.
Reviews
There are no reviews yet.