Description
छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले.
कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली.
मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे.
केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे.
हा युगपुरूष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!
आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार अन् अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.
———————————————————————————————————————–
नव्या पिढीचे तरुण आणि बालकांवर संस्कार करण्याचे काम आई-वडील, गुरुजनवर्गाबरोबरच चांगले साहित्यही करत असते.
साहित्यातून ज्ञानाची गंगाच दारी येते.
त्यातून मग चांगले विचार, चांगले मूल्ये आणि चांगल्या जगण्याची शिदोरीच लाभते.
‘श्रीमती इंदुमती यार्दी यांनी ह्या पुस्तकात जगभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग रंजक पद्धतीने सांगितले आहे.
ह्याच्या वाचनाने त्या थोरपुरुषांच्या जीवनमूल्यांचे दर्शन होईलच; पण ते प्रसंग नव्या पिढीला पथदर्शकही ठरतील.
या विविध प्रसंगातून प्रामाणिकपणा, सेवाभाव, ज्ञानपिपासूवृत्ती, त्याग, लोकशाही निष्ठा, मानवता, अहिंसा, प्रेम नि परोपकाराची भावना वाढीस लागणे, ह्या संस्कारांची ओळखही, होते. चांगले संस्कार चांगली माणसे घडविण्यास मदतच करत असतात.
याचा प्रत्यय हे पुस्तक देते.
Reviews
There are no reviews yet.