Description
‘मोठ्या परिणामांच्या छोट्या गोष्टी’ एक असा जादुई क्षण असतो जेव्हा एखादी कल्पना,
रीत किंवा सामाजिक वर्तन एक विशिष्ट मर्यादा ओलांडून वणव्याप्रमाणे पसरू लागते.
ज्याप्रमाणे एका साध्या माणसाकडून सर्दीतापाच्या संसर्गाची सुरुवात होऊ शकते त्याचप्रमाणे एक लहानसे; पण अचूकपणे केंद्रित केलेले चलन एखाद्या फॅशनला, नवीन वस्तूच्या लोकप्रियतेला वा गुन्हेगारीच्या घटीसाठी कारणीभूत ठरू शकते.
या नावाजलेल्या पुस्तकात माल्कम ग्लॅडवेल ही कल्पना विस्तृतपणे मांडतात आणि अत्यंत हुशारीने या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेची उकल करतात. या कल्पनेमुळे जगभरातील लोकांनी आपले उत्पादन विकण्याबद्दल आणि आपल्या कल्पनेचा प्रसार करण्याबद्दलच्या विचारसरणीत बदल करायला सुरुवात केली आहे.
“खिळवून ठेवेल असे चित्तवेधक… अद्भुत आणि पुरस्कारयोग्य”.
-क्लॅरे डिडेरर, सिएटल टाइम्स
“ग्लॅडवेल यांना अवघड, किचकट कल्पना स्पष्ट आणि सोप्या करून सांगण्याची कला अवगत आहे. हे पुस्तक एक उत्तम प्रवासी मार्गदर्शक आहे.”
-ख्रिस्तोफर हॉथ्रोन, सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल
“व्यवसायाची पद्धत म्हणून ‘मोठ्या परिणामांच्या छोट्या गोष्टी’ हे पुस्तक खचितच उत्कृष्ट आहे. ‘हस्तकौशल्याच्या तंत्राबद्दल नवीन पद्धतीची माहिती यात पुरेपूर भरली आहे.”
-अरॉन गेल, टाइम आउट
माल्कम ग्लॅडवेल हे सर्वाधिक खपाच्या यादीत प्रथम क्रमांकावर असलेल्या ‘द पॉवर ऑफ थिंकिंग विदाउट थिंकिंग’ या पुस्तकाचेही लेखक आहेत. वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रासाठी त्यांनी १९८७ ते १९९६ या काळात वार्ताहर म्हणून काम केले आहे. ते प्रथम वैज्ञानिक लेखक म्हणून आणि नंतर न्यूयॉर्क सिटी ब्युरो चीफ म्हणून कार्यरत होते. १९९६ पासून ते द न्यूयॉर्करसाठी लेखन करत आहेत.
Reviews
There are no reviews yet.