fbpx

Vatevarlya Savlya | Teel Aani Tandul

₹525

403Pages
AUTHOR :- G. D. Madgulkar
ISBN :- 978-9352206094

Share On :

Description

मराठीतल्या ज्या काही लेखकांच्या असामान्य भाषाशैलीवर मी मातृवत प्रेम केले, त्यापैकी ग. दि. माडगूळकर हे एक. गेयतेचे प्रासादिक लेणे ल्यालेली त्यांची कविता ही अभिजात खरीच. वाचकाच्या आणि श्रोत्यांच्या थेट काळजात उतरणारी माडगूळकरांची अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न शब्दकळा हे मराठी साहित्याचे एक मोठे भूषण. पंचवीस‡तीस हजार जाणकार श्रोते एका वेळेला त्यांचे ‘गीत‡रामायण’ ऐकायला उपस्थित राहतात. ही अद्भुत किमया मराठी कवितेच्या क्षेत्रात फक्त ग. दि. माडगूळकरच करू शकले. अन्य कोणा नावाची त्यांच्या जागी कल्पनाही करता येत नाही.
पद्य‡लेखणीइतकीच गदिमांची गद्य‡लेखणीही अतिशय प्रासादिक व प्रवाही. त्यांच्या प्रसन्न कवितेशीच नाते साधणारी. या पुस्तकात पानोपानी वाचकाला या नात्याची ओळख पटल्यावाचून राहणार नाही.
व्यक्तिचित्रे हा साहित्यप्रकार एकंदरीत तसा उपेक्षितच म्हणावा लागेल. केवळ मराठीतच नव्हे, तर अन्य कुठल्याही जागतिक भाषेत या प्रकारचे लेखन फारसे होतच नसावे. मराठीपुरते बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, कथा-कादंबरी-काव्य-चरित्र-आत्मचरित्र इत्यादी साहित्याच्या तुलनेने व्यक्तिचित्रसंग्रहांची संख्या कितीशी भरेल? नाही म्हणायला गेल्या दोन‡अडीच दशकांत मराठीत काही उत्तम व्यक्तिचित्रसंग्रह प्रसिद्ध झाले. या पोर्शभूमीवर गदिमांचा प्रस्तुत संग्रहही खचितच लक्षणीय ठरेल.
या संग्रहातल्या नुसत्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी एक गोष्ट तत्क्षणी उमगते की, किती विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींशी माडगूळकरांचे निकटचे संबंध होते. त्यांची लेखणी या व्यक्तींमधल्या माणुसकीचा सतत वेध घेत असते. त्यांच्या जीवनातल्या लहानसहान प्रसंगांतूनही मोठा आशय मांडते. सर्वसामान्य घटनांतून असामान्यत्वाचे दर्शन घडवते. मनुष्यजीवनातल्या काही निष्ठांवर, आदर्शांवर आणि मंगल मूल्यांवर माडगूळकरांचा नितांत विेशास आहे. या संग्रहातील पुष्कळशा लेखांना त्यांच्या अस्सल भारतीय तत्त्वचिंतनाचा परिसस्पर्श झालेला आहे. सामान्यांची दु:खे माडगूळकरांच्या सहृदय लेखणीत सामावली की, व्यक्त होताना त्या दु:खांना एक तीव्र धार चढते. काळजाला ती जाणवल्यावाचून राहत नाही. त्या माणसांमधली उदात्तता सांगताना माडगूळकरांची शब्दकळा साक्षात चैतन्यरूप धारण करते.
– आनंद अंतरकर

————————————————————————————————————————–

या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी स्वत:च्या मातु.श्री, मा. विनायक, आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, वि.स. खांडेकर, बाबूराव पेंटर, सुधीर फडके आदी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दांत आणि सहज शैलीने रेखाटली आहेत. त्या-त्या परिस्थितीतील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना तर त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करुन करुण-व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर उभी राहतात.
गदिमा हे मराठी साहित्य-संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते. ऋतुपरत्वे अनेक उन्हाळे, पावसाळे, वादळे या झाडाने पाहिली आणि साहिली. तरीही हे स्वाभिमानी व कष्टाळू झाड ताठ उभे होते. असीम दारिद्य्र व अपार कष्ट अशा खडतर वाटचालीतूनही त्यांनी मराठीला काही अभिजात व कलापूर्ण चित्रपट दिले. त्यांच्या या अपूर्व देण्याबद्दल मराठी माणूस कृतज्ञ आहे. मराठी मनावर स्वत:ची एवढी दृढ-सखोल छाप ठेवणारा कलावंत विरळाच म्हणावा लागेल. आपल्या रुपाने गदिमांनी साहित्य-चित्रसृष्टीत एक वैभवशाली पर्वच निर्माण केले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vatevarlya Savlya | Teel Aani Tandul”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat