Bolu Kawatuke | बोलू कौतुके

₹160

152Pages
AUTHOR :- Eknath Pagar
ISBN :- 9788177868821

Share On :

Description

“…भाषासमाज हा बहुरूपी आहे, त्याचा काटेकोर अंदाज बांधता येत नाही. तांत्रिक क्लृप्ती, कृती असे भाषावापराचे स्वरूप असत नाही. भाषा हा वाहता, स्वतःला उन्नत करणारा संवादी-प्रवाह आहे. आपण सारेच या प्रवाहाला खळाळते ठेवतो, आपली बोली घडवतो. आपला भाव आणि गुणही त्या प्रवाहात मिसळतो. माणूसपणाचे रंगरूप यांचे लेपन आणि अंतःसत्त्वही भाषाप्रवाहात प्रतिबिंबित झालेले असते.
भाषेचा ‘भाषा’ म्हणून, ‘चिन्हव्यवस्था’ म्हणून वेगळा विचारही आपण करीत नाही, तशी वेळही कधी दैनंदिन जगण्यात येत नाही. आपल्या भाषावापराचे न्याहाळणे येथे घडले आहे. आपण असतोच भाषेत, आपली अभिव्यक्तिरूपे भाषास्वरूपात सरमिसळून गेलेली…
आपल्याच ऐकण्या-बोलण्याचा जमेल तसा छडा लावावा… जे वाटले, ते म्हणावे बोलावे, आपल्या भाषावापराची आपण पाहणी करावी, ही धारणा असल्याने हे सारे भाषेचे भजन…”

Click To Chat