fbpx

The Power of Your Subconscious Mind | As A Man Thinketh

₹325

398 Pages
AUTHOR :- Joseph Murphy, James Allen
ISBN :- 978-9352204700

Share On :

Description

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
• आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.
• प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.
• हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.
• आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.
• तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.
• भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.
• ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.

———————————————————————————————————————–

या पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार : माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो.

माणूस स्वत:मुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते.

दैवत्व आणि पशू या दोन अंतिम ध्रुवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो.
चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत.

ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो, सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्यांच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतूमध्ये त्यांच्या हेतूंची पेरणी झालेली असते.

त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत.
शरीर मनाचा गुलाम असतो… आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Power of Your Subconscious Mind | As A Man Thinketh”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat