Aai Hotana | Garbhavatisathi Sampurna Margadashan | आई होताना | गर्भवतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन |

₹525

368 Pages
AUTHOR :- Dr. Savita Panat
AUTHOR :- Dr. Jayant Baride
ISBN :- 9789371187817

Share On :

Description

प्रस्तुत ग्रंथामुळे स्त्रियांचे अनेक शारीरिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक प्रश्न व्यापकपणे समाजासमोर आले आहेत.गर्भारपणातील आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्यांची अतिशय सुबोध अशी चर्चा आणि उपायांसंबंधीचे मार्गदर्शन या ग्रंथात करण्यात आले आहे.
डॉ. सुधीर रसाळ ज्येष्ठ समीक्षक व लेखक
पाना-पानांवर लेखिका जे कळकळीने सांगतात,ते केवळ स्त्री आणि तिच्या नातेवाइकांसाठीच नाही.नव्या डॉक्टरांसाठीही एक संयत आणि समष्टीच्या कल्याणाचा सूर असणारा एक अप्रत्यक्ष हितोपदेश आहे.
– डॉ. वृषाली किन्हाळकर

गर्भवतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन’ असं या पुस्तकाचं शीर्षक असलं तरी ‘बाळाचा जन्म’ या माणसाच्या आयुष्यातील सर्वस्पर्शी अनुभवाभोवती करण्यात आलेली या पुस्तकातील मांडणी आईसह बाळाचे वडील, आजी-आजोबा यांचीही ‘बाळ जन्मा’च्या विविध टप्प्यांवरची भूमिका नेमकेपणाने स्पष्ट करते.
तक्ते, चित्र यांच्या मदतीने शास्त्रीय माहिती देणारं हे पुस्तक ‘बाळा’च्या आगमनाची तयारी साऱ्या कुटुंबांनी कशी करावी, हे सांगणारी कार्यपुस्तिका आणि जगण्याबद्दलचे शिक्षण देणारी मार्गदर्शिकाही आहे.
बाळाच्या आईबरोबरच कुटुंबीयांच्या मनातील अनेक संभाव्य प्रश्नांची उत्तरं मिळतानाच, गैरसमज दूर करणारं आणि जीवनकौशल्य विकसित करण्यास साहाय्यक ठरू शकेल, असं हे वैद्यकीय-तज्ज्ञांचं पुस्तक कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं वाचावं असंच आहे.
संपूर्ण पुस्तकात सकारात्मकतेचा एक अंतःप्रवाह वाहत असतो. गर्भावस्थेसाठी योगासने, आहार, संगीत या साऱ्यांचं महत्त्व सांगतानाच, प्राथनेशी त्याचं नातं जोडणं, हे एकाअर्थी सृष्टी आरंभाशी, मानव जन्माशी नातं जोडण्यासारखं आहे.
मर्ढेकरांसारखा युगप्रवर्तक कवी लिहितो-
“पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
थांब उद्यांचे माऊली
तीर्थ पायांचे घेईतो”
तुमच्या-आमच्या मनातही ‘मातृ-देवते’बद्दल अशीच भावना असते ना?
– संजय आर्वीकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aai Hotana | Garbhavatisathi Sampurna Margadashan | आई होताना | गर्भवतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन |”

Your email address will not be published. Required fields are marked *