Description
जेव्हा तुम्ही तुमच्या यशास पाठबळ मिळेल अशा पद्धतीने विचार करता, बोलता आणि तशी कृती करता, तेव्हा तुम्ही यशाची दारे खऱ्या अर्थाने सर्व बाजूने ठोठावत असता… आणि जीवनातील तुमच्या अपूर्व अशा यशाच्या मार्गाने वाटचाल करीत असता.
तुम्ही अशा प्रवासाचा आरंभ करीत आहात की, जो तुम्हाला स्वप्नवत असलेले यश आणि आनंद मिळवून देणार आहे, तर मग चला प्रवासास सुरुवात करू या….
या पुस्तकात प्रामुख्याने लेखकाला स्वत:ला आलेले नैराश्य पळवून लावण्यासाठी त्याने केलेले जोरदार प्रयत्न आणि कालांतराने त्यावर केलेली मात हे खरोखरीच विलक्षण असून, इतरांना प्रेरणात्मक ठरणारी अशीच बाब आहे.
‘‘हे पुस्तक पूर्णत: मनोवृत्ती या विषयावर आधारित आहे. या इंग्रजी पुस्तकाबद्दल येथे आवर्जून सांगावेसे वाटते की, वेळोवेळी आणि प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीस नमूद केलेली उदाहरणे, किस्से हे खूपच खुमासदार आणि मार्मिक असे आहेत.
मनुष्याच्या जीवनात दृष्टिकोन किती महत्त्वपूर्ण काम करतो, हे पदोपदी लक्षात येते. ‘दृष्टिकोन म्हणजेच सर्वकाही’ आणि ‘तुमच्या दृष्टिकोनात बदल करा… आणि तुमचे जीवनच बदलेल!’ या दोन्ही उक्ती किती सार्थ आहेत, हे पुस्तक वाचताना लगेच पटते. ’’
———————————————————————————————————————–
या पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार :
माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो.
माणूस स्वत:मुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते.
दैवत्व आणि पशू या दोन अंतिम ध्रुवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो.
चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत.
ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो, सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्यांच्यावर मात केलेली असते.
योग्य ऋतूमध्ये त्यांच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात.
त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत.
शरीर मनाचा गुलाम असतो… आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.
Reviews
There are no reviews yet.