fbpx

As A Man Thinketh | The Law Of Attraction

₹424

368 Pages
AUTHOR :- Esther And Jerry Hicks, James Allen
ISBN :- 978-9352206032

Share On :

Description

या पुस्तकात अब्राहम यांच्या मूळ शिकवणुकीची शक्तिशाली पायाभूत तत्त्वं सांगितली आहेत. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टी या सर्वांत शक्तिशाली ‘वैश्विक आकर्षणाच्या नियमा’च्या कार्यामुळे कशा घडतात, हे या पुस्तकातून तुम्हाला कळेल. “Like attracts like”, “Birds of a feather flock together” fonal “It is done unto you as you believe.” 379ft glide वाक्यं आपण ऐकलेली असतात. थोडक्यात, ‘सारख्याकडे सारखं ओढलं जातं.’ हे आपल्याला माहीत असतं आणि या ‘आकर्षणाच्या नियमाबद्दल’ याआधी काही थोर विद्वानांनी ओझरतं लिहिलंही आहे. मात्र, ईस्थर आणि जेरी हिक्स या बेस्टसेलर लेखकद्वयींच्या या पुस्तकात हा नियम जितक्या स्पष्टपणे आणि प्रत्यक्षात अनुसरण करण्याजोग्या पद्धतीने समजावून सांगितला आहे तितका तो याआधी कोणीही सांगितलेला नाही.
या पुस्तकातून तुम्ही सार्वकालिक वैश्विक नियम काय आहेत आणि त्यांचा वापर आपल्या उन्नतीसाठी कसा करून घ्यायचा हे शिकाल. या पुस्तकातलं ज्ञान तुम्ही अंगी बाणवून घेतलंत की, तुमच्या दैनंदिन जीवनातले अंदाज, शक्यता, भाकितं असे अनिश्चित प्रकार लुप्त होतील आणि अखेर आता तुम्हाला तुमच्या जीवनातील व तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट कशी घडते याचं ज्ञान होईल. तुम्हाला मनापासून कराव्या वाटणाऱ्या गोष्टी आनंदानं करायला आणि मिळवायला हे पुस्तक तुम्हाला मदत करेल.
आपली आनंदी राहण्याची मूळ स्थिती प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या मुभा देण्याच्या कलेबद्दल अब्राहम यांनी जे सांगितले आहे ते ‘Ask and It Is Given’ आणि ‘The Amazing Power of Deliberate Intent’ या पुस्तकांची लेखकद्वयी ईस्थर आणि जेरी हिक्स यांनी या पुस्तकातून मांडलं आहे. दरवर्षी साठहून अधिक शहरांमध्ये या विषयावरच्या कार्यशाळा आयोजित करण्यासोबतच हिक्स दांपत्यानं या विषयावर सातशेहून अधिक अब्राहम- हिक्स पुस्तकं, कॅसेट्स, सीडीज्, व्हिडिओज् आणि डीव्हीडीज् प्रकाशित केल्या आहेत. www.abraham-hicks.com ही त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेली वेबसाइट आहे.

————————————————————————————————————————

या पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार : माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो.
माणूस स्वत:मुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अंतिम ध्रुवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो.
चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत.
ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो, सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्यांच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतूमध्ये त्यांच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत.
शरीर मनाचा गुलाम असतो… आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “As A Man Thinketh | The Law Of Attraction”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat