Description
गर्भसंस्कार हा आमच्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे. ह्या पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय व आध्यात्मिक ज्ञानाला नवीन विज्ञान व संशोधनाची जोड मिळाल्याने गर्भसंस्कारशास्त्र अजूनच परिपूर्ण व उपयुक्त झाले आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपले मूल बुद्धिमान, सुंदसर, सद्गुणी व्हावे. आपल्या धर्मग्रंथांनी, महापुरुषांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, मुलावर गर्भात असतानाच संस्कार केल्यास ते जास्त प्रभावी ठरतात. सुभद्रा, कौशल्या, माँ जिजाऊ, त्रिशला, राणी मदलसा, मदर मेरी, भुवनेश्वरी देवी यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे सहज पटू शकते. गर्भसंस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलाला आयुष्यभर साथस देईल अशी शिदोरी आपण देत असतो. कारण गर्भारपणात बाळाची प्रत्येक नवीन पेशी तयार होतानाच आई-वडिलांच्या जीन्समधून जे घटक बाळामध्ये संक्रमित होतात, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. गर्भसंस्काराच्या ज्ञानाचा वापर करून गर्भारपणातील नऊ महिने जर आहार, विहार, संस्कार व या पुस्तकात दिलेल्या इतर बाबींचे आचरण केल्यास होणारी संतती नक्कीच तेजस्वी व बुद्धिमान होईल. त्यामुळे मुलांच्या उत्तम जडण-घडणीचा प्रवास सुखकर होण्यास ही पायाभरणीच ठरेल. देशाची भावी पिढी घडविण्यात खारीचा वाटा उचलणारे आणखी एक पुस्तक आपल्या हाती देतानार मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे.
————————————————————————————————————————
आई’ होणं सोपं असतं; पण ‘आईपण’ येणं अवघड असतं. बाळाची गर्भातली वाढ, त्याचा जन्म आणि जन्मानंतरचा विकास या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. हे वरदान त्रासदायक ठरू नये म्हणून गर्भवतीची योग्य ती काळजी घ्यावी लागते. गर्भावस्थेत गर्भाला अन्नपुरवठा होतो तो मातेकडून म्हणून प्रत्येक महिन्यानुसार होणारी बाळाची वाढ व त्या वाढीला नेमक्या कोणत्या अन्नपदार्थाची गरज असते, कोणता आहार बाळाला सुदृढ, अव्यंग होण्यास उपयुक्त असतो, मेंदूच्या पेशींची वाढ, हृदयाचे स्नायू, हाडे, मज्जारज्जू, आतडी, फुप्फुसे या सर्वांच्या अत्युत्तम वाढीसाठी कोणत्या पौष्टिक आहाराचा पुरवठा हवा, तसेच पूर्वशालेय व शालेय मुलांना कोणता व कसा आहार दिला जावा याबद्दल प्रस्तुत पुस्तकात तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आहे. आपण आपल्या मुलांवर जन्मापासून अनेक संस्कार करतो. त्यांच्यावर अन्नसेवनाचे संस्कारही करायचे आहेत. त्यांचे पोषण ही आपली जबाबदारी आहे. केवळ यासाठी वाचकांना बाळ, आहार आणि पोषण साक्षर करण्याचा प्रामाणिक हेतू असणारे हे मार्गदर्शक पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.