Nitimulyanchya Sanskarkatha

₹150

80 Pages
AUTHOR :- Prof. Suhas Bartakke
ISBN :- ‎ 978-9349573369

Share On :

Description

प्रा. सुहास द. बारटक्के यांनी अध्यापन, लेखन आणि पत्रकारिता यामध्ये आपली कारकीर्द व्यतीत केली आहे. चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयातील वाणिज्य विभागात ३५ वर्षे अध्यापनाचे काम करीत असताना सातत्याने १०० टक्के निकाल; तसेच अभ्यासक्रम पुनर्रचनेसह विविध शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘आदर्श शिक्षक व गुरुवर्य पुरस्काराने’ गौरवण्यात आले आहे.
आकाशवाणीच्या मुंबई व रत्नागिरी केंद्रावरून त्यांची ८० हून अधिक भाषणे, कथाकथन व नभोनाट्याचे प्रसारण झाले आहे. दै. महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार, दै. पुढारी, दै. गोमंतक, दै. हेरॉल्ड, मासिक भटकंती, मासिक किशोर, साप्ताहिक विवेक इत्यादींचे ते स्तंभलेखक म्हणूनही ओळखले जातात.
मुलांसाठी त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांच्या एकूण पाच कथांचा समावेश पाठ्यपुस्तकात धडे म्हणून करण्यात आला आहे. काझीरंगाच्या जंगलात (इ. ३ री), सदूचं बिल (इ. ६ वी.), खरा नागरीक (इ. १० वी), पळस, पांगारा, शेवर (बी.ए. भाग – १) इत्यादी लेखन पाठ्यपुस्तकात घेण्यात आले आहे. त्यांची प्रौढ वाङ्मयातील १६ आणि बाल वाङ्मयातील ११ पुस्तके महाराष्ट्रातील नामवंत प्रकाशकांनी प्रसिद्ध केली आहेत. निसर्गविषयक लेखन हा त्यांच्या लेखनाचा मुख्य गाभा असतो.
त्यांच्या पुस्तकांना व कथांना महाराष्ट्र शासनाच्या सृष्टीमित्र पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी आचार्य अत्रे विनोदी लेखक पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद, बालकुमार साहित्य सभा, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, पुणे, आजरानगर वाचनालय, अ. भा. मराठी प्रकाशक संघ, मराठी साहित्य संघ (ठाणे), अक्षरमित्र पुरस्कार (मुंबई) अशा एकूण चौदा पुरस्कारांचा समावेश आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nitimulyanchya Sanskarkatha”

Your email address will not be published. Required fields are marked *