Description
आठ वर्षांची तिसरीतली साची. ती आजोबांना म्हणाली, “मी गोष्ट सांगते. तुम्ही लिहून घ्या.” ती गोष्ट सांगू लागली. आजोबा लेखनिक झाले. २०२१ साली तिने पाच गोष्टी सांगितल्या. लेखनिक आजोबा कौतुकाने लिहीत गेले.
एकदा आजोबांनी लिहिताना तिचा एक शब्द बदलला. साची पटकन म्हणाली, “मी सांगितलेला शब्द बदलू नका.” आजोबांनी तिचा आदेश पाळला. २०२२ साली चौथ्या वर्गात तिने पुन्हा पाच गोष्टी लिहिल्या.
साचीच्या अशा या दहा गोष्टी. ग्रंथांशी मैत्री अन् वाचन-लेखन संस्कारांचा वारसा लाभलेल्या साचीच्या गोष्टींतून एक प्रकारच्या नीतिकथाच पुढं आल्यात. लेखन संस्कारांचे स्वप्न पाहिलेल्या तिसऱ्या पिढीतील या निरागस लेखिकेची ही सुरुवात आहे.
या अगोदर साचीने गोष्टींचे व्हिडिओ केले आहेत. आकाशवाणी केंद्रात काही गोष्टी सांगत धीटपणे मुलाखत दिली होती. ग्रंथप्रेमातून ज्ञान- विज्ञानाची पताका खांद्यावर घेऊ पाहणारी ही बाललेखिका ! तिच्या कथा म्हणजे उद्याच्या लेखिकेच्या पाऊलखुणाच आहेत.
बालकांवर वाचन-लेखनाचे संस्कार करणे, ही आजची गरज आहे. पालकांनी सर्जनशीलतेचे हे कर्तव्य सांभाळले, तर घरोघरी साचीसारखे बाललेखक वाचन-लेखनाची सुरुवात करू शकतील. ‘साचीच्या गोष्टी’ ही त्याची सुरुवात आहे.”
– धारा भांड – मालुंजकर
————————————————————————————————————————
ही गोष्ट आहे जपानमधील चिमुरड्या सादाकोची.
दुसर्या महायुद्धात जेव्हा हिरोशिमावर पहिला अॅणटमबॉम्ब टाकला, तेव्हा ती केवळ दोन वर्षांची होती.
नऊ वर्षांनी सादाकोला ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झाला.
विनाशकारी बॉम्बच्या विषारी किरणांनी तिचं सुंदर, निरागस बालपण झाकोळलं आणि या गोड, गुणी, चुणचुणीत हसर्या सादाकोची मृत्यूशी झुंज सुरू झाली.
चिझुको तिची वर्गातली मैत्रीण. सादाकोला भेटायला दवाखान्यात येते. एक सोनेरी कागद दाखवत सांगते, ‘‘आजारी व्यक्तीनं जर एक हजार कागदी बगळे तयार केले, तर देव त्याची इच्छा पूर्ण करतो, त्याला निरोगी बनवतो.’’ आणि सादाकोची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती उसळून येते.
हसतमुखाने एक-एक कागदी बगळा बनविताना कॅन्सरशी चिवट झुंज सुरू राहते.
या जिद्दी सादाकोचं पुढं काय होतं? ती वाचली काय?
आज जगभर सत्तासंघर्षाच्या अभिलाषेनं आणि उग्र दहशतवादाच्या विध्वंसक प्रवृत्तीनं ग्रासलं आहे. जागोजागी हिंसक प्रकार डोकं वर काढीत आहेत आणि यात सादाकोसारखे निष्पाप बळी जात आहेत.
अशा वेळी विश्वमानवता, विश्वशांतीची आठवण करून देणार्या सादाकोच्या शांती स्मारकावरील ओळींचा संदेश आज वर्तमानाची गरज वाटू लागते.
आमचा हा आक्रोश आहे,
हीच आमची प्रार्थना,
जगात या शांती लाभो !
————————————————————————————————————————-
आपल्या जडणघडणीत अनेकांची मदत होत असते. जन्मदाते आई-वडील, गुरुजनवर्ग, आजूबाजूंची परिसाचे हात आणि आभाळाची माया असलेली माणसं यात असतात. अशा माणसांच्या सहा गोष्टी इथं सांगितल्या आहेत. स्वत:पलीकडे बघून ‘बापू तू शिकलं पाहिजे’ सांगणारी आभाळाची सावली झालेली वेणूआई मांगीण आहे. गोरगरिबांचा कैवारी होऊन जुलमी सावकाराचा कर्दनकाळ झालेला तंट्या भिल्ल आहे. भीमराव आंबेडकर या हुशार मूलातील तेजस्वी नायक हेरणारे सयाजीराव गायकवाड तसेच आहेत. जीवनात आनंदी व्हायचं असेल तर पैशाने विकत घेता येणार नाही अशा गोष्टींचा शोध घ्या, दुसऱ्यास आनंद देण्याचं शिका, हे सूत्र सांगणारी आनंदयात्रा तशीच आहे. तर स्वतः काम करून कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहणारा आदिवासी हुकूमचंद आडे हा उद्याचा आमचा नायकही एक आहे. आपापली कमाई खरी असावी, ही माझी बालवीर जीवनातील गोष्ट आयुष्य सुंदर करण्यास मदत करू शकेल. स्वत:पलीकडे बघायला सुरुवात करा. हे केलं तर आपलं जगणं सुंदर होऊ शकेल. त्याची सुरुवात मात्र आपण स्वत:पासून करायला हवी. – बाबा भांड
Reviews
There are no reviews yet.