fbpx

Sara Kahi Mulansathi | सारं काही मुलांसाठी

₹250

216Pages
AUTHOR :- Shobha Bhagwat
ISBN :- 9789352200214

Share On :

Description

आज पालकांच्या जगण्यातले ताण-तणाव मुलांमध्ये आपसूक झिरपत आहेत. पालक जिंकण्यासाठी धावत सुटले आहेत आणि बाहेरची प्रस्थापित व्यवस्था याला मदत करते आहे. अशा वातावरणात मुलाचं ‘मूलपण’ सांभाळण्याचं, जोपासण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय.
कामातला आनंद, खेळातली मजा, कष्टांचा अनुभव, निर्मितीसाठी गंमत, नात्यांची ऊब, क्वालिटी टाइम, निसर्गाशी नातं, जगण्याचा आत्मविश्वास आणि या सगळ्यांतून मुलांच्या हाती सहज लागणारी ‘मूल्यं’ या सर्वांचा हा प्रवास आहे.
आपण पालक मुलांना कधी ही पाच वाक्यं लक्षात ठेवून सांगतो का?
त् माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
त् माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे.
त् तू हे किती छान केलंस.
त् तुझं मत मला महत्त्वाचं वाटतं.
त् सॉरी बरं का! माझ्या लक्षातच नाही आलं.
पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे! तेव्हा पालकांनो, मुलांसाठी सारं काही करताना सोबतच हेही करा.

Additional information

About Author

शोभा भागवत
शिक्षण : अनुभव :
एम.ए. (मराठी, संस्कृत) मुंबई विद्यापीठ, मुंबई ५ वर्षे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या शैक्षणिक संशोधन संस्थेत 'प्रौढशिक्षण व अनौपचारिक शिक्षणात संशोधन. २ वर्षे 'स्रीवाणी' या स्त्री अभ्यास संस्थेत 'दलित स्त्रियांची प्रतिमा' या प्रकल्पात काम व संशोधन. १९८५ पासून 'गरवारे बालभवन' या मुलांच्या क्रीडारंजन-विकास संस्थेच्या संचालिका. (संस्थेत रोज ५०० मुले शाळेनंतर खेळायला येतात. वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम, शिबिर, सण-उत्सव, रोजचे क्रीडा रंजन कार्यक्रम असे अनेक उपक्रम येथे चालतात.) पालक शिक्षण, शिक्षण, बालसाहित्य या विषयांवर पुस्तके प्रकाशित. अनेक लेख, कविता प्रकाशित. दूरदर्शन व आकाशवाणी कार्यक्रमांचे लेखन. इंग्लंड, अमेरिका, अरब देशांत वास्तव्य. ३० युरोपीय देशांचा सलग ८ महिने प्रवास. गेली ३५ वर्षे पालक शिक्षण व अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन. मुले, संस्था कार्यकर्ते, शिक्षकांसाठी शिबिरे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sara Kahi Mulansathi | सारं काही मुलांसाठी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat